सचिवाने केली संस्था व देणगीदारांची १७ लाखांत फसवणूक

सचिवाने केली संस्था व देणगीदारांची १७ लाखांत फसवणूक

मोदलपाडा ता.तळोदा वार्ताहर MODALPADA

संस्थेने आर्थिक व्यवहाराचा कुठलाही हक्क अधिकार दिलेला नसतांना संस्थेच्या (organization) देणगीदारांनी संस्थेत दिलेली १७ लाख रुपयांची देणगीची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याने सचिवाविरुद्ध (secretary) तळोदा पोलिसात फसवणुकीचा (fraud)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोदा येथील मनुमाता बहुद्देशीय नावाची संस्था आहे. या संस्थेत सेक्रेटरी म्हणून दीपक केशवलाल चावडा (वय ४०, धंदा व्यापार रा.कॉलेज रोड, तळोदा) हे कामकाज करत होते. त्यांच्याकडे संस्थेच्या देणगीदारांकडून येणार्‍या देणग्यांचा हिशोब ठेवणे, संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार, मूळ दप्तर, प्रोसीडिंग बुक, संस्थेचे दैनंदिन व्यवहार त्या त्या रजिस्टरमध्ये नोंदणी करणे अशी कामे होती.

असे असतांना यातील त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेने कुठलाही हक्क व अधिकार दिलेले नसतांना देणगीदाराकडून मिळालेले सुमारे १७ ते १८ लाख रुपये भूलथापा देऊन व खोटी आश्वासने देऊन स्वतःजवळ ठेवले.

स्वतःच्या फायद्यासाठी देणगीदारांची, संस्थेची बदनामी व आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने ही रक्कम संस्थेच्या खात्यात जमा न करता महत्वाचे दस्तावेज, देणगी पुस्तके, प्रोसिडींग बुक आदी महत्वाची कागदपत्रे आपल्या कब्जात ठेऊन मनुमाता बहुद्देशीय संस्थेची तसेच देणगीदारांची फसवणूक केली.

त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष योगेश प्रभाकर चौधरी (वय ४६ रा.कल्पना टॉकीज तळोदा) यांनी तळोदा पोलिसांत फिर्याद दाखल केल्याने दीपक केशवलाल चावडा याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळोदा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com