शहाद्यात 16 लाखांची विदेशी दारु जप्त

शहाद्यात 16 लाखांची विदेशी दारु जप्त

शहादा । shahada

ट्रॅक्टरमध्ये (Tractor) शेणखतात लपवून बेकायदेशीर विदेशी दारु दारूची चोरटी वाहतूक करणार्‍या अवैध दारूसह 16 लाख 10 हजाराचा मुद्देमाल नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने (Nandurbar Local Crime Branch) जप्त केला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. शिरपूर येथून अक्कलकुवा तालुक्यात सदर मालाची वाहतूक करण्यात येत होती.

महाराष्ट्र पोलीस पोलीस उप - महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांचे आदेशान्वये संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारू तस्करांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दि.13 फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना बातमी मिळाली की दि.14 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मंदाणा ता. शहादा गावाकडुन एक लाल रंगाचे ट्रॅक्टरमध्ये (Tractor) शेणखत भरलेले असून त्याखाली देशी विदेशी दारुचे खोके ठेवून अवैध देशी विदेशी दारुची चोरटी वाहतुक करणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली होती , त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर माहिती कळवून योग्य ते मार्गदर्शन करुन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले .

त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार केले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पिंपड़े ता . शहादा गावाच्या पूढे रस्त्यावर दबा धरून बसले असता 00.45 वा सुमारास असलोद गावाकडुन पिंपडे गावाकडे एक लाल रंगाचे ट्रॅक्टर (Tractor) येतांना दिसले म्हणून पथकातील अमलदारांनी त्यास हाताने व बॅटरीच्या सहाय्याने ट्रॅक्टर उभे करण्याचा इशारा देवून ट्रॅक्टर (Tractor) थांबविले. त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या अमंलदारांनी आपली ओळख देवून ट्रॅक्टर चालक लखन ऊर्फ गणेश दला भिल रा.वाडी बुद्रुक ता . शिरपुर जि . धुळे असे सांगितले.

ट्रॅक्टर (Tractor) चालकास ट्रॅक्टरमध्ये काय भरलेले आहे बाबत विचारपुस करता त्याने ट्रॅक्टरमध्ये शेणखत भरलेले आहे असे सांगीतले.बाबत सांगितले मिळालेल्या बातमीप्रमाणे ट्रॅक्टरमध्ये शेणखत दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टरमधील शेणखत बाजूला केले असता तेथे विदेशी दारुचे कागदी पृष्ठाचे खोके ठेवलेले मिळुन आले . ट्रॅक्टर चालकास दारु वाहतुकीचा परवाना आहे काय ? असे विचारले असता त्याचेकडे दारु वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले तसेच ट्रॅक्टर (Tractor) चालकास सदरचा माल कोणाकडून आणला बाबत विचारले असता त्याने बोराडी ता. शिरपुर येथील पिंटु पाटील याच्याकडून घेवून अक्कलकुवा गावाच्या पुढे 2 ते 3 कि.मी. वर सेाडण्यासाठी घेवून जात आहे असे सांगीतले.

या ट्रॅक्टरमधील संपूर्ण शेणखत बाजुला करुन पाहता त्यात खाकी रंगाचे खोके दिसुन आल्याने खोके उघडुन पाहिले असता त्याल 6 लाख 86 हजार 400 रुपये किमतीची बॉम्बे व्हिस्कीच्या 180 एम.एल.चे एकुण 110 बॉक्स व त्यामध्ये 5280 सिलबंद काचेच्या बाटल्या , 1 लाख 68 हजार 480 रुपये किमतीची किंगफिशर स्ट्राँग बिअरचे 500 एम.एल. चे एकुण 39 बॉक्स व त्यामध्ये 936 बिअरचे पत्रटी टिन , 55 हजार 200 रुपये किमंतीची माऊन्टस -6000 सुपर स्ट्राँग बिअरचे 500 एम. एल. चे एकुण 20 बॉक्स व त्यामध्ये 480 बिअरचे पत्रटी टिन, तसेच 7 लाख रुपये किमंतीचे एक महिद्रा कंपणीचे 575 लाल रंगाचे ट्रॅक्टर (Tractor) व मागे ट्रॉली विना नंबरचे असलेले असा एकुण 16 लाख 10 हजार 80 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला आहे. शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे .

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, पोलीस शिपाई विजय ढिवरे यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com