महाशिवरात्रीच्या प्रसादामुळे 135 जणांना विषबाधा

तालुक्यातील राकसवाडे येथील घटना
महाशिवरात्रीच्या प्रसादामुळे 135 जणांना विषबाधा

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे (Raksawade) गावात महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivaratri) आयोजित भंडार्‍याच्या प्रसादामुळे (Bhandardya's prasada) 135 जणांना विषबाधा (Poisoning) झाली असून 40 जणांना राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) सलाईन लावण्यात आलेली आहे. उर्वरितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्‍याच्या प्रसादामुळे (Bhandardya's prasada) 135 जणांना विषबाधा (Poisoning) झाली असून 40 जणांना राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईन लावण्यात आलेली आहे. उर्वरितांना उपचारानंतर (treatment) घरी सोडण्यात आले आहे.रुग्णांच्या संख्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान याठिकाणी वैद्यकीय पथक उपस्थित असून जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) तेथे पोहोचले असून उपचार सुरू आहे. राकसवाडे येथे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक गावात असून परिस्थिती आता नियंत्रणात आली असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात (Tehsildar Bhausaheb Thorat) यांनी दिली.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी जाफर तडवी, राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विंचूरकर व त्यांचे सहकारी यांनीदेखील मेहनत घेतली. अशावेळी रुग्णांचे समुपदेशन करणे यावेळी फार महत्त्वाचे असते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com