नंदूरबार जिल्हयात आढळले १३ कोरोना रुग्ण

नंदूरबार जिल्हयात आढळले १३ कोरोना रुग्ण
कोरोना

नंदूरबार Nandurbar l प्रतिनिधी

नंदूरबार जिल्हयात आज दि.३ जानेवारी रोजी तब्बल १३ जणांचा (people) अहवाल (Report) कोरोना पॉझिटीव्ह (corona patients) आला आहे.

नंदूरबार जिल्हयात सलग तीन दिवस तीन तीन रुग्ण आढळले होते.आज दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी नंदुरबार प्रशासनातर्फे 94 जणांची आरटीपीसीआर चाचणी अहवाल प्राप्त झाला.त्यात नंदूरबार शहरातील ३ तर शहादा तालुक्यात 4 कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.

दरम्यान प्रशासनातर्फे दि.३ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजेला पुन्हा 94 जणांची आरटीपीसीआर चाचणी अहवाल प्राप्त झाला.त्यात नंदूरबार शहरातील ६ जणांचा अहवाल तर कोरोना पॉझिटीव्ह आढळला.दि.३ जानेवारी रोजी जिल्ह्यात एकूण १३ कोरोना रुग्ण आढळले.

नंदूरबार जिल्ह्यात ४ दिवसात २३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com