हातधुई आश्रमशाळेतील १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मृतदेह ताब्यात घेण्यास कुटूंबाचा नकार
हातधुई आश्रमशाळेतील १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मोलगी | वार्ताहर- molagi

हातधुई (Hatdhui) ता.धडगाव येथील आश्रमशाळेतील (Ashram School) बारावीच्या विद्यार्थ्याने (student )शाळेच्या आवारात गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली. दरम्यान, मृतदेहाचे परस्पर शवविच्छेदन केल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

उतारपाडा ता.धडगाव येथील आकाशा बावा तडवी (वय १८) हा हातधुई ता.धडगाव आश्रमशाळेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेता होता. दि.२७ डिसेंबरच्या पुर्वी त्याने आश्रमशाळेसमोरील ५० मीटर लांबवरील दरीमध्ये झाडावर गळफास घेवून आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तो गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. शाळेपासून पन्नास मीटर लांब अंतरावर असलेल्या झाडाला आकाश बावा तडवी या विद्यार्थ्याचा मृतदेह गळफास घेतल्याचे आढळून आल्यानंतर शाळा प्रशासनाने त्याच्या कुटुंबाला न कळवता परस्पर धडगाव पोलिसांना बोलावून पंचनामा केला.

तसेच शवविच्छेदनही केले. त्यानंतर त्याच्या परिवाराला माहिती दिली. त्यामुळे सदर मुलाने आत्महत्या का केली, याचे कारण अस्पष्ट आहे.

या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिवाराने केली आहे. तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत हातधुई आश्रमशाळा येत असून प्रकल्प अधिकारी मैनक घोष यांनी याबाबत शवविच्छेदनाच्या अहवालानंतर चौकशी समिती नेमून मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत माहिती घेणार असल्याचे सांगितले.

सदर घटनेबाबत धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे मयत विद्यार्थ्यांच्या परिवाराने मृतदेह घेण्यास नकार देत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मुख्याध्यापकांच्या कार्यालयात असलेल्या मृतदेहाशेजारी परिवार ठाण मांडून बसले होते. मुलाच्या आकस्मिक मृत्यूने आई-वडील भाऊ हतबल झाले आहेत. दरम्यान, शाळेच्या शिक्षकांच्या त्रासामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे पालकांनी मृतदेह शाळेच्या कार्यालयात ७ ते ८ तास ठेवले. जोपर्यंत संबंधित जबाबदार शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदह उचलणार नाही यावर ठाम राहिले.

त्यानंतर आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. एम. साबळे आल्यावर व त्यांनी संबंधित कर्मचार्‍यांची चौकशी करून निलंबनाची लेखी आश्वासन दिले. त्यानंतर पालक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला.

अंत्यविधीसाठी रोख दहा हजार रुपये देऊन आदिवासी प्रकल्पच्या वतीने दोन लाख सानुग्रह मदतीचे कार्यवाही सुरू असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत आश्रमशाळेचे अधीक्षक दिनेश मारोतीराव ढोले यांनी दिलेल्या खबरीनुसार धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ शिवदास पाडवी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com