नंदुरबारात ११ तलवारी जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
नंदुरबारात ११ तलवारी जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार शहरातील अंधारे चौकात एका खाजगी (Travels) ट्रॅव्हेल्समधून ११ तलवारी (Sword) जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नंदुरबार (lcb) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

याबाबत (police) पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डॉ.अंधारे हॉस्पिटल परिसरातून एका खाजगी ट्रॅव्हेल्समधून ११ तलवारी जप्त करण्यात आल्या. या तलवारींची किंमत ६ हजार ६०० रुपये आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर कारवाई केली. ११ तलवारींपैकी नंदुरबारला ३, तळोदा व अक्कलकुवा शहरात प्रत्येकी १ तसेच इतर ठिकाणी या तलवारी नेल्या जाणार होत्या.

पो.कॉ. आनंदा पावबा मराठे यांच्या फिर्यादीवरुन गणेश ईश्वर सोनार पाहिजे, खुशाल काशिनाथ हिरणवाळे (दोन्ही रा.नंदुरबार) यांच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ चें उल्लंघन २५ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय मोहिते करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com