धडगाव येथे ११ लाखाची दारु जप्त

दोघांविरुद्ध गुन्हा
धडगाव येथे ११ लाखाची दारु जप्त

मोलगी, ता.अक्कलकुवा | वार्ताहर MOLAGI

धडगाव येथील मोलगी MOLAGI रस्त्यावर आज सायंकाळी ५ च्या सुमारास पोलीसांनी police ११ लाख १३ हजाराची विदेशी दारु Exotic liquor व ८ लाखाचे वाहन असा एकुण १९ लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त Confiscated केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव शहरातील मोलगी रस्त्यावरील कनकुवा पेट्रोलपंपासमोर आज दि.७ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास पवन होमसिंग चौधरी (रा.मडकानी ता.शहादा) व प्रविण दिलीप वसावे (रा.कुरंगी ता.शहादा) हे बोलेरो पिक अप (क्र.एमएच १३-एनएक्स ६७२३) मध्ये विदेशी दारुची वाहतूक करतांना आढळून आले.

त्यांचा वाहनाची पोलीसांनी तपासणी केली असता त्यात ९ लाख ७५ हजार रुपये किमतीची बॉम्बे व्हिस्की कंपनीचे १५० बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये १८० एमएलच्या ५० प्लास्टिक क्वार्टर होत्या. प्रत्येक क्वार्टरची किंमत १३० रुपये आहे.

तसेच १ लाख ३८ हजार रुपये किमतीची सुपर स्ट्रॉंग पॉवर १०००० बियरचे टीन असलेले ५० बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये २४ टीन बियर होती. प्रत्येक टीनची किंमत ११५ रुपये आहे. याशिवाय ८ लाखाची महिंद्रा बोलेरे जिप असा एकुण १९ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.

याबाबत पोना दीपक वारुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहूल भदाणे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com