आयान कारखान्याच्या आगीत 11 कोटींचे नुकसान

आयान कारखान्याच्या आगीत 11 कोटींचे नुकसान

नंदुरबार । Nandurbar

तालुक्यातील समशेरपूर (Samsherpur) येथील आयान साखर कारखान्यातील (aayan Sugar Factory) मळीला आग लागून सुमारे अकरा कोटीचे नुकसान झाले आहे. आज सकाळी ही आग लागली. आगीत कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नसल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनातर्फे देण्यात आली.

तालुक्यातील समशेरपुर येथील आयान मल्टीट्रेड एल.पी.युनिट या साखर कारखान्यात साखर उत्पादन होत आहे. वाढलेल्या उष्णता तापमानामुळे टाकीतील मळीला आग लागली. या आगीत मळी जळून खाक झाली. साखर कारखान्याच्या टाकीतील मळीने उष्ण तापमानामुळे आज सकाळी पेट घेतला.

मळी ज्वलनशील पदार्थ असल्याने वाढलेल्या उष्णतेमुळे ते स्वतः पेट घेतात. त्यामुळे टाकीतील 9805.400 मेट्रिक टन मळी जळून खाक झाली. मळी जळाल्याने कारखान्याचे सुमारे अकरा कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आली असून त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कारखाना व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.