नगरसेवकांचा मतदारांनी केला सन्मान

मतदारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्धः हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी
नगरसेवकांचा मतदारांनी केला सन्मान

तळोदा/मोदलपाडा | ता.प्र./वार्ताहर- TALODA

येथील पालिका प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका सौ.अनिता परदेशी यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक २ मध्ये जी कामे केलीत व मतदारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहिले म्हणून त्यांच्या छोटेखानी सत्काराच्या कार्यक्रम प्रभाग क्रमांक दोन मधिल मतदारांच्या वतीने करण्यात आला.

सदर कार्यक्रमात नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी, संदीप परदेशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मराठे आदींचा सत्कार प्रभाग क्रमांक दोनच्या मतदारांतर्फे करण्यात आला.

याप्रसंगी नगरसेवक कसा असावा याबाबत निसार मक्राणी, जाकीर मनसुरी, याकुब पिंजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी सांगितले,

प्रभागातील जनतेचे नगरसेवक व नगरसेविका यांच्या प्रतीचे प्रेम पाहून तळोद्यात येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे हितूभाऊ, अनिताताई सारखेच नगरसेवक आम्ही प्रत्येक प्रभागात देऊन प्रभाग क्रमांक २ च्या जनतेप्रमाणेच् विश्वास संपादन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू,असे सांगितले.

यावेळी दोन्ही नगरसेवकांनी सत्काराप्रसंगी सांगितले की, यापुढे आम्ही नगरसेवक असलो नसलो तरीही या प्रभागातील नागरिकांचे कामे तनमनधनाने करु गेल्या पाच वर्षांत आमची सत्ता नसतांनाही जो शब्द मतदारांना दिला होता तो आम्ही पाळला व प्रभालाच आमचा परिवार समजून आम्ही काम केलीत व प्रभागतील जनतेने ही आम्हाला परिवारातील पोरांसारखे प्रेम दिले.

युवानेते संदीप परदेशी यांनी सांगितले की आम्ही प्रभाग क्रमांक दोन मध्ये मतदारांकडून जी जी कामे सांगितली गेली ती कामे प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रभागात ५ वर्षात केलेली कामे थोडक्यात सांगत सदर पाच वर्षांत या प्रभागामध्ये आम्हाला जे सहकार्य व प्रेम दिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाप्रसंगी मुस्लिम समाजाध्यक्ष आरीफ नूरा, निसार मक्राणी, याकुब पिंजारी, जाकीर मन्सुरी, सादिक सैय्यद, समद मनियार, सादिक पिंजारी, महेमूद कुरेशी, मोहसिन कुरेशी, कलीम कुरेशी, नासिर हाजी, नदिम बागवान, राहुल पाडवी, गणेश राणे, धर्मराज पवार, इमरान शिकलीकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश मराठे यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com