
मोदलपाडा Modalpada । वार्ताहर
केंद्र सरकारच्या(Central Government's) जल जीवन मिशन (Water Life Mission) अंतर्गत तळोदा तालुक्यातील 70 गावांना नळ पाणी पाणीपुरवठा योजना (Tap water supply scheme) मंजूर करण्यात आली असून ही कामे टेंडर प्रक्रियेत (tender process) असल्याने लवकरच कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने (Rural Water Supply Department) दिली.
केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेमुळे तळोदा तालुक्यातील 70 टक्के गावांमधील जीर्ण पाणी पुरवठा योजना मार्गी (Tap water supply scheme) लागणार आहे. ग्रामीण भागातील गावकर्यांना मुबलक व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून तेथील पाणी पुरवठा योजना नव्याने कार्यान्वित करण्याचा सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. त्यासाठी केंद्र सरकारने जल जीवन मिशन (Water Life Mission) योजना हाती घेतली आहे. या योजनेतून त्रयस्थ संस्थेमार्फत तळोदा तालुक्यातील बहुतेक गावामध्ये जावून प्रत्यक्ष सर्वे करण्यात आला होता.
त्यांच्या सर्वेनुसार तालुक्यातील 70 गावांची निवड करून येथील पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी शासनाच्या सबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात आला होता. या यंत्रणेने युद्ध पातळीवर पडताळणी करून या गावांची नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी दिली आहे. आता टेंडरची प्रक्रिया राबविली जात असून येत्या सात, आठ दिवसांच्या आत कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या (Rural Water Supply Department) सूत्रांनी दिली.
तळोदा तालुक्यात 96 गावे आहेत.त्यापैकी 70 गावांमध्ये हर घर नळ योजना घेण्यात आली आहे. म्हणजे 75 टक्के गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील गावकर्यांनी शासनाच्या या धोरणात्मक निर्णयाचे समाधान व्यक्त केले आहे. कारण या गावांमधील नळ पाणी पुरवठा योजना अत्यंत जीर्ण झाल्या होत्या. शिवाय अनेक ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना अपूर्ण होत्या.कामांच्या अनियमीततेमुळे त्या गेल्या सात, आठ वर्षांपासून रखडल्या होत्या. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. आता या गावांमधील नळ पाणी पुरवठा योजना कायमची मार्गी लागणार आहे. सदर योजनेमुळे तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील पड्यांची पाण्याची समस्या देखील दूर होणार आहे.अनेक पाडे देखील घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
योजनेसाठी 70 कोटींचा निधी
या योजनेत शासनाने गावातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार निधी (Funding in proportion to population) देण्याचे नियोजन केले आहे.त्यानुसार या योजनेसाठी कमीत कमी 50 लाख रुपये एका गावांसाठी मंजूर करण्यात आली आहेत. संपूर्ण तळोदा तालुक्याकरीता साधारण 70 कोटी रुपयांचा निधी (Funding) उपलब्ध झाला असल्याचेही सांगण्यात आले आहे. यात गावातील संपूर्ण जल वाहिन्या, प्रत्येक घरी नळ कनेक्शन, स्वतंत्र जलकुभ, कुपनलिका, वीज जोडणी आदी कामांच्या यात समावेश आहे.
दसवड येथे भूमिपूजन
तळोदा तालुक्यातील दसवड येथे देखील शासनाचा जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. सदर योजनेचे गेल्या आठवड्यात खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते भूमिपूजन(Bhumi Pujan) करण्यात आले. या वेळी गावातील आजी, माजी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. गावात नव्याने पाणी पुरवठा योजना घेण्यात आल्याने गावकर्यांनी समाधान व्यक्त केले होते.