सायबर क्राइम
सायबर क्राइम

गुगलवरुन नंबर शोधला अन् झाली सायबर चोरट्यांकडून फसवणूक

जळगाव - Jalgaon

शहरातील जगवानी येथील रहिवासी पवनकुमार महावीरसिंह शाक्य (वय २९) या कंपनी कामगाराने नवीन क्रेडीट कार्डच्या (credit card) समस्येबाबत विचारणा केली असता कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून संबंधितांनी पवनकुमार यांची १ लाख ३१ हजारात ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पवनकुमार यांना क्रेडीट कार्डचे (credit card) २ हजार ७३६ रुपये एवढे बिलाबाबत त्यांच्या मोबाईल व मेसेज आला. त्याबाबत विचारणा करण्यासाठी पवनकुमार यांनी गुगलवरुन एसबीआय बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधला. त्यावर संपर्क सधून समस्या सांगितली. फोनवर बोलणार्‍यांनी विश्‍वास संपादन करुन कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून पवनकुमार यांच्याकडून क्रेडीट कार्डचा नंबर घेतला.

नंबर देताच पवनकुमार यांच्या मोबाईलवर चार वेळा २५ हजार २५० रुपयांची तर एकदा ३० हजार रुपयांची खरेदी केल्याचे मॅसेज आले. अशाप्रकारे एकूण १ लाख ३१ हजार रुपयांत ऑनलाईन फसवणुकीची खात्री झाल्यावर पवनकुमार यांनी याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाला ऑनलाईन तक्रार दिली होती.

मात्र तरीदेखील पैसे परत न मिळाल्याने सोमवार, १६ ऑगस्ट रोजी पवनकुमार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन फसवणूक करणार्‍या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

गुगलवरुन नंबर शोधतांना घ्या काळजी

गुगल या सर्च इंजिनमधून अनेक फेक क्रमांक समोर येत असतात. एसबीआय कस्टमर केअरचा नंबर सर्च केल्यास एसबीआयच्या ऑफिशीय वेबसाईटवरुनच क्रमांक घ्यावा. दुसऱ्या वेबसाईटवरुन असे फोन नंबर काढल्यास फसवणूक होते. पवनकुमार यांच्यांसंदर्भात असाच प्रकार झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com