जि.प.च्या औषध निर्माण अधिकार्‍याची उचलबांगडी

औषध खरेदीत दिरंगाई भोवली; रावेर प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली
जळगाव जि.प
जळगाव जि.प

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

गेल्या चार महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या(Zilla Parishad) सर्वसाधारण सभेत (general meeting) प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांसाठीची चार कोटींची औषध खरेदी (Drug purchase) करण्यास मान्यता दिली होती. मात्र, तब्बल तीन महिने उलटून देखील प्रशासनाकडून औषधांची तोडकीच खरेदी करण्यात आल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा (Drug shortage) जाणवत असल्याची ओरड झाली. सध्या उन्हाची दाहकता असल्याने रूग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असतांना जि.प.आरोग्य विभागाकडून औषधी खरेदीसाठी दिरंगाई केली जात असल्याचेे जि.प.प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेच्या औषध निर्माण अधिकार्‍याची (Pharmaceutical Officer's) उचलबांगडी करीत रावेर येथे बदली करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेने चार कोटींची औषध खरेदी करण्यास मान्यता देवूनही जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र यांच्यासाठीची औषधी खरेदी (Drug purchase) करण्यासाठी टेंडर प्रकिया राबवून फक्त 15 ते 16 लाखांची खरेदी करण्यात आली. मात्र, त्यानंतर अनेक औषधांची खरेदी करण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरूच असून काही औषधांच्या ऑर्डर दिल्या असल्या तरी त्या अजून आल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोट्यावधीचा निधी मंजूर असतांना जि.प.आरोग्य विभागाकडूनच कोलदांडा घातला जात होता.

जिल्हा परिषद सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी दोन महिन्यापुर्वीच औषधांची टेंडर प्रक्रिया राबविण्याचे आदेश देवूनही औषध खरेदीमध्ये (Drug purchase) दिरंगाईचे धोरण अवलंबिले जात असल्याचे निदर्शनास आल्याने सीईओंनी चौकशी केली असता कामात हलगर्जीपणा करणार्‍या जि.प.च्या औषध निर्माण अधिकारी (Pharmaceutical Officer's) रवींद्र पाटील यांची थेट उचलबांगडी करीत दोन दिवसांपूर्वीच रावेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बदलीचे आदेश काढल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्या जागी चिनावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे पंकज श्रीकांत साळुंखे यांची वर्णी लागली आहे.

जि.प.सीईओंनी औेषधी खरेदी करण्याच्या सूचना देवूनही अंमलबजावणी करण्यात कुचराई केल्याप्रकरणी जि.प.औषध निर्माण अधिकारी रवींद्र पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून त्यांची बदली रावेर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच पदावर करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये त्यांच्या बदलीचा बार उडावण्यात आला आहे. आता मात्र, बदली रद्द करण्यासाठी औषध निर्माण अधिकारी रवींद्र पाटील यांनी राजकीय पदाधिकार्‍यांकडून फिल्डींग लावण्याची चर्चा रंगू लागली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com