जि.प. आरोग्य विभागातील कक्ष अधिकार्‍यांसह 15 जणांना नोटीस

दांडीबहादर कर्मचार्‍यांची जि.प.सीईओंकडून झाडाझडती
जळगाव जि.प
जळगाव जि.पJalgaon ZP

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) बायोमॅट्रीक पध्दतीने (biometric method) कर्मचार्‍यांची हजेरी (Attendance of employees) घेतली जात असली तरी अनेक विभागात कर्मचारी हजेरी लावून चहा पिण्याच्या नावाखाली गायब होत असल्याचा प्रकार घडतो. त्यामुळे दांडीबहादर कर्मचार्‍यांवर (Dandi Bahadar staff) जरब बसावा यासाठी शुक्रवारी जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया (CEO Dr. Pankaj Asia) यांनी थेट जि.प.आरोग्य विभागात दुपारी 1 वाजता अचानक भेट देवून झाडाझडती घेतली. त्यात 15 कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. विषेश म्हणजे आरोग्य विभागाचे कक्ष अधिकारी यांच्यासह दोन्ही कार्यालयीन अधीक्षक देखील विभागातून गायब होते. त्यामुळे गैरहजर असलेल्या 15 कर्मचार्‍यांना सीईओंनी सायंकाळी नोटीस (Notice) बजावली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेत गेल्या सहा महिन्यापासून प्रशासक राज आहे. प्रशासकीय कामकाजात सीईओंनी शिस्त आणून कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कामांना गती देवून झिरो पेंन्डसीवर भर दिला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागात कर्मचारी गायब होवून वैयक्तिक कामासाठी बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने दि. 19 ऑगस्ट रोजी जि.प. सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी जि.प.आरोग्य विभागात दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक भेट देत हजेरीचे मस्टर तपासले असता यात बहुतांश कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आढळून आल्या नाही.

आरोग्य विभागातील 15 कर्मचारी कामावर असतांना ते बाहेर गेल्याचे निदर्शनास आल्याने जि.प.सीईओंनी त्यांना तडकाफडकी नोटीस बजावून 3 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे.

या कार्यालयातील विभाग प्रमुख, जिल्हा आरोग्याधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेले होते. तर अन्य कर्मचारी मात्र बाहेर गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी जि.प.सीईओंनी शिक्षकांच्या वैद्यकिय बिलाच्या फाईली मागवून तपासणी केली. गेल्या काही दिवसापासून वैद्यकिय बिले येवून देखील ती पुढे पाठविली जात नसल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे ती बिले तात्काळ निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले.

जि.प.सीईओंच्या अचानक भेटीने तपासणीदरम्यान त्यांनी कर्मचार्‍यांना सक्त ताकीद दिली. त्यामुळे दांडीमार कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com