
रावेर | प्रतिनिधी raver
तालुक्यातील गट (Zilla Parishad) व (Panchayat Samiti) गणांच्या नव्या रचनेने अनेक मात्तबर अस्तित्व टिकवण्यासाठी गट व गणाचा आभ्यास करत आहे. नव्याने झालेले गट कुणाच्या फायद्याचे व कुणाच्या नुकसानीचे याबाबत खल होत असून, इच्छुक उमेदवार मात्र त्यांच्या पुढील व्यूहरचनेकरिता भेटी-गाठी आणि समीकरणे यावर लक्ष ठेवून आहे. अनेक गट बदलले गेले आहे. त्यामुळे जुन्या पदाधिकार्यांना नव्या गटात व गणात बस्थान बसवावे लागणार आहे. नवीन संरचनेत १ गट व २ गणाची वाढ झाली आहे.
रावेर (raver) तालुक्यात पाल-खिरोदा गटातील पाल पं. स. गणात पाल, हमांडली नवी, तिड्या, अंधारमळी, निमड्या, गारबर्डी, गारखेडा, सहस्त्रलिंग, लालमाती, कुसंबे बुद्रुक, कुसुंबे खुर्द या गावांचा समवेश आहे.
खिरोदा प्र. यावल गणात, रोदा प्र.यावल,कळमोदा,सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द, गौरखेडा, जानोरी, लोहारा, चीचाटी, मोहंमाडली जुनी या गावांचा समावेश आहे. पूर्वी या गटातील गावांचा पाल-केऱ्हाळे गटात समावेश होता.
नव्याने झालेल्या रसलपूर-केऱ्हाळे गटातील रसलपूर पं. स. गणात रसलपूर, खिरोदा, रावेर, बक्षिपूर, रमजीपूर, शिंदखेडा, जिन्सी, गुलाबवाडी, मोरव्हाल या गावांचा समावेश आहे. तर केऱ्हाळे गणात केऱ्हाळे बुद्रुक,केऱ्हाळे खुर्द,अहिरवाडी,मोहगन खुर्द,अभोडा बुद्रुक,अभोडा खुर्द,पिंप्री,मंगरूळ,जुनोने या गावांचा समावेश आहे.
वाघोड-खिरवड गटातील वाघोड पंचायत समिती गणात वाघोड, कर्जोद, खानापूर, अजनाड, चोरवड, पाडळे खुर्द, पाडळे बुद्रुक, निरूळ, अटवाडे या गावांचा समावेश आहे.
खिरवड गणात खिरवड, भोकरी, मोरगांव खुर्द, मोरगाव बुद्रुक, दोधे, नेह्ता, तामसवाडी, बोरखेडा, पुनखेडा, भोर, पातोंडी, बोहर्डे या गावांचा समावेश आहे.
ऐनपूर-निंभोरा बुद्रुक गटातील ऐनपूर पं. स. गणात नपूर, विटवे, सांगवे, निंभोरासीम, थेरोळे, धूरखेडा, धामोडी, कोळोदे, सुलवाडी या गावांचा समावेश आहे. निंभोरा बुद्रुक गणात निंभोरा बुद्रुक, निंबोल, वाघाडी, रेंभोटा या गावांचा समावेश आहे.
विवरे बुद्रुक-चिनावल गटात विवरे बुद्रुक गणात विवरे बुद्रुक, विवरे खुर्द, नांदूरखेडा, अजंदा, भाटखेडा, मुंजलवाडी या गावांचा समावेश आहे.
चिनावल पंचायत समिती गणात चिनावल, कुंभारखेडा, उटखेडा या गावांचा समावेश आहे.
वाघोदे बुद्रुक व बलवाडी गटात वाघोदे बुद्रुक गणात वाघोदे बुद्रुक, कोचुर बुद्रुक, कोचुर खुर्द, बोरखेडासीम, रोझोदा, वडगांव या गावांचा समावेश आहे.
बलवाडी पंचायत समिती गणात मस्कावद सीम, मस्कावद बुद्रुक, मस्कावद खुर्द, वाघोदा खुर्द, सुनोदा, आंदलवाडी, बलवाडी, दसनूर व सिंगनूर या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
तांदलवाडी-थोरगव्हाण गटातील तांदलवाडी गणात तांदलवाडी, सिंगत, शिंगाडी, भामलवाडी, पुरी, गोलवाडे, खिर्डी बुर्दुक, खिर्डी खुर्द, कांडवेल या गावांचा समावेश आहे.
थोरगव्हाण गणात थोरगव्हाण, मांगी, चूनवाडे,गाते, मांगलवाडी, रायपुर, गहुखेडे, रणगांव, सुद्गांव, तासखेडे, उदळी बुद्रुक, उदळी खुर्द, लुमखेडा या गावांचा समावेश आहे.