जिल्हा परिषद निवडणुकीचा ऑगस्टमध्ये वाजणार बिगुल!

ओबीसीसह इतर आरक्षण सोडतीकडे इच्छुकांच्या लागल्या नजरा
जिल्हा परिषद निवडणुकीचा ऑगस्टमध्ये वाजणार बिगुल!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांसह (Panchayat Committees) जिल्हा परिषद (Zilla Parishad) निवडणुकांमधील (elections) आरक्षण (reservation) निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commissions) घोषित केला आहे. दि.28 जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याने अनेकांना उत्सुकता लागून असून आता इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. आरक्षण सोडतीनंतर (Reservation draw) निवडणूक कार्यक्रम लवकरच लागणार असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल (bugle) ऑगष्ट महिन्यात वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

jalgaon zp
jalgaon zp

सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या शिफारशींना मान्यता देत ओबीसींना 27 टक्के आरक्षण बहाल केल्याने स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये ओबीसींच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल ऑगष्ट महिन्यात वाजणार असल्याचे आता निश्चित आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा न्यायालयात मिटल्यानंतर निवडणूक आयोगाने आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यात दि.28 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत तर पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण तहसीलदारांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात होणार आहे. गेल्या आठवड्यातच आरक्षण सोडतच प्रक्रिया दि.13 रोजी होणार होती. मात्र, तत्पुर्वीच आयोगाने त्याला स्थगिती दिली होती. त्यानंतर न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने आता या निवडणुकांमध्ये ओबीसी उमेदवारांनादेखील संधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागस प्रवर्ग व महिला (अनु.जाती,अनु.जमाती,नागरिकांचा मागासप्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसह) यांच्यासाठी आरक्षण सोडत होणार आहे.आरक्षण सोडतीची सूचना 26 जुलै रोजी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि.28 जुलै रोजी जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकार्‍यांंच्या उपस्थितीत आणि गणांची प्रत्येक तहसीलदारांच्या उपस्थितीत होणार आहे.

दि.29 जुलै रोजी आरक्षणाची प्रारूप रचना प्रसिध्द केली जाणार आहे. दि.29 जुलै ते दि.2 ऑगष्ट यादरम्यान हरकती व सूचना सादर करता येणार आहे. तसेच आरक्षण सोडतीचे अंतिम राजपत्र 5 ऑगष्ट रोजी प्रसिध्द होईल. त्यामुळे आरक्षण नेमके कोणत्या गटात काय निघते? यावर गणित ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com