निधी खर्चात जिल्हा परिषद ढिम्म

10 महिन्यात राखीव निधीतून 50 टक्केही खर्च नसल्याची बाब उघड
निधी खर्चात जिल्हा परिषद ढिम्म

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेसाठी (Zilla Parishad) राखीव ठेवण्यात आलेल्या निधीतून संबंधित यंत्रणांनी उचल न केल्याने 50 टक्के निधी देखिल खर्च (Fund Expenditure) झालेला नसल्याने निधी खर्चात जिल्हा परिषद पूर्णत: ढिम्म असल्याचे जिल्हा नियोजन बैठकीत उघड झाले. दरम्यान दि. 15 फेब्रुवारीपर्यंत निधी खर्च करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत.

निधी खर्चात जिल्हा परिषद ढिम्म
तीनशे रूपयांची लाच 'मनिषा'ला घेवून गेली गजाआड
निधी खर्चात जिल्हा परिषद ढिम्म
Beauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा...

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी जळगावचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आदि उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्रशासनाविषयी नाराजी

जिल्हा नियोजन भवनात आयोजित बैठकीत विभागनिहाय निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला. यात जिल्हा परिषद विभागाकडील निधी खर्चच होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गत वर्षात जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांकडे कोट्यावधी रूपयांचा निधी होता. मात्र त्यातून फारशी उचल न झाल्याने कामे होऊ शकली नाही.

निधी खर्चात जिल्हा परिषद ढिम्म
Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप

परिणामी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत 15 फेब्रुवारीपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर ज्या विभागांनी अद्याप प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केलेले नाही.

त्यांनी तांत्रिक मान्यता घेऊन प्रस्ताव सादर करावे, प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या कामांची वर्क ऑर्डर देऊन कामे सुरु करावीत. जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी सांगितले, ज्या विभागांना प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन कामे सुरु झालेली त्यांनी निधीची मागणी करावी, ज्यांचा निधी विहित कालावधीत खर्च होणार नाही त्यांनी निधी परत करावा,शासकीय यंत्रणांनी तातडीने सादर करावे अशा सूचना देण्यात आल्या.

निधी खर्चात जिल्हा परिषद ढिम्म
अन गुरूजीही बनावट लिंकच्या जाळ्यात अडकतात तेव्हा...

जि.प. तील विभागनिहाय निधीची उचल

जिल्हा पशुसंवर्धन - 60 लाख उचल - 9 लाख, ग्रामपंचायत नागरि सुविधा 1.5 कोटी उचल 48 लाख, जनसुविधा 12 कोटी उचल 1 कोटी, यात्रास्थळ 4 कोटी 20 लाख उचल 1 कोटी 23 लाख, बंधारे 17 कोटी 48 लाख उचल 2 कोटी, ग्रामीण मार्ग 23 कोटी उचल 4 कोटी 65 लाख, प्राथमिक शाळा दुरूस्ती 3 कोटी उचल 1 कोटी 16 लाख, शाळा खोली बांधकाम 16 कोटी 24 लाख उचल 4 कोटी 70 लाख, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम 50 कोटी उचल 12 कोटी, अंगणवाडी 8 कोटी 61 लाख उचल 2 कोटी 16 लाख अशी आकडेवारीच आज नियोजन बैठकीत सादर करण्यात आली.

दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषद यंत्रणेला तंबी दिली असून निधी खर्च न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

निधी खर्चात जिल्हा परिषद ढिम्म
खंबाळेतील लाचखोर तलाठी गजाआड
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com