
धानोरा Dhanora ता. चोपडा - वार्ताहर
येथून जवळच असलेल्या बिडगाव (Bidgaon) येथे धानोरा महावितरण कार्यालयाकडून () विजबील वसुलीसाठी डिपी बंद (DP off) केली होती. ती डिपी सुरु करण्यासाठी रविवार रोजी सकाळी आठ वाजता गेलेला झिरो वायरमन दत्तु पाटील (Zero Wireman Dattu Patil) याचा शॉक (shock) लागून होरपळून मृत्यू (death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळी आठ वाजता घडलेल्या घटनेनंतर वीज वितरणचे अधिकारी तब्बल अकरा वाजता घटनास्थळी आल्याने त्यांना ग्रामस्थांनी चक्क पोलिसांसमोरच चोप दिला.
बिडगाव येथे शेतशिवारात होणारा विजपुरवठा विजबिलांच्या वसुलीसाठी बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. बिडगाव शिवारात गट नं १८१ मध्ये असलेली ११ क्रमांकाची डिपी धानोरा विज वितरणने बंद केली होती. ती डीपी रविवारी सकाळीच सुरू करण्यासाठी गेलेला बिडगांव येथील झिरो वायरमन दत्तु आत्माराम पाटील वय ४६ यांचा विजेचा शॉक लागून होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिस घटनास्थळी येवून थांबले होते.मात्र सदर घटना सकाळी अकरा वाजता घडली याची माहिती देऊनही विजवितरणचे अधिकारी उशीरा आल्याचा आरोप करत धानोरा विज वितरणने कनिष्ठ अभियंता डि.डि.घरजारे व चोपडा विभागीय अभियंता एन.एस.रासकर हे ११ वाजता घटनास्थळी आल्यावर त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्याना मारहाण सुरू केली व पोलीसांसमोरच अक्षरशः चोप देत पळवून लावले. ते जेमतेम जिव वाचवत कसेतरी वाहनापर्यंत पोहचले.
यावेळी पोलीस व सुज्ञ नागरिकांनी आवरा - आवर केल्याने मोठा अनर्थ टळला.याबाबत अडावद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तर अभियंता मारहाण प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर घटनेचा स.फौजदार सुनिल तायडे व पो.कॉ. जयदीप राजपूत यांनी पंचनामा केला आहे.तर मयत दत्तु पाटील यांच्या मृतदेहाचे चोपडा ऊपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी चार वाजता शोकाकुल वातावरणात बिडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात पत्नी,भाऊ,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.