बंडखोरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला - आदित्य ठाकरे

बंडखोरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला - आदित्य ठाकरे

पाचोरा - प्रतिनिधी pachora

भावाने शिवसेना सोडली तर आम्ही कितीही संकटे आली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडणार नाही. स्व.आर.ओ.तात्या जिवंत असते तर उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले असते. तात्यासाहेब यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी आज युवासेना प्रमुख यांच्या शिव संवाद दौऱ्या पासून राजकारणात सक्रिय झाल्याची घोषणा आर.ओ.तात्या यांच्या कन्या वैशालिताई सुर्यवंशी (Vaishalitai Suryavanshi) यांनी केली. माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपल्या भाषणात बंडखोर आमदारांना गद्दार ठरवून धारेवर धरले.

बंडखोरांना शिवसेना आणि ठाकरे घराण्याला संपवायचे आहे.परंतु जनमत आमच्या सोबत आहे.बंडखोरांनी आमदारकीचा राजीनामे देऊन निवडणूक लढवून दाखविण्याचे जाहीर आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.

यावेळी व्यासपीठावर सौ. वैशाली ताई सुर्यवंशी नरेंदसिंग सुर्यवंशी, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना युवा सेना सचिव सूरज चव्हाण, लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महिला संघटिका जिल्हाप्रमुख अंजली ताई नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाध्यक्ष रावेर दिपकसिंग राजपूत, विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, युवासेना प्रमुख विराज कावडिया, उपजिल्हाप्रमुख ॲड.अभय पाटील मा.जि.प. सदस्य उद्धव मराठे रमेश बाफना, युवा सेनासंपर्क प्रमुख समाधान पाटील, नगरसेवक दादाभाऊ चौधरी दत्ता जडे, शिवसेना उपशहरप्रमुख अनिल सावंत माजी शहर प्रमुख भरत खेडलवाल, गणेश परदेशी मनोहर चौधरी, धर्मराज पाटील, विलास पाटील, डॉ.व्ही.एम.पाटील, अजय पाटील, राकेश जोशी, रवी सोनवणे निलेश सपकाळे संजय सावंत, मोतीलाल चौधरी दिपेश सावंत उदय पाटील बंडू मोरे, नाना वाघ, पपु जाधव उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com