गावठी कट्ट्यासह युवक ताब्यात

गावठी कट्ट्यासह युवक ताब्यात

वरणगाव, ता.भुसावळ । Varangaon । वार्ताहर

येथील 22 वर्षीय युवकास गावठी कट्टा व दोन काडतूससह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरणगाव येथे एक युवक गावठी कट्टा बाळगत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळाली असता पो.नि. किसन नजन पाटील यांनी या कामगिरीवर हे.कॉ. दीपक पाटील, प्रमोद लाडवंजारी, मोहन धनगर, वाहनचालक मुरलीधर बारी यांना पाठवले होते.

यावेळी पोलिसांना वरणगाव बस स्थानक चौकात पारस हॉटेल लगत उदय राजू उजलेकर (वय 22, रा.आंबेडकर नगर, मेहतर वाडा वरणगाव) याला एक गावठी कट्टा व दोन काडतुसासह रंगेहात पकडले. यावेळी पोलीसांनी त्यास याबाबत विचारले असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे सांगण्यात आले. पंचासमक्ष मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या गावठी कट्टा व काडतूस यांची अंदाजे किंमत 31 हजार रुपये आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. प्रमोद लाडवंजारी यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीसात भारतीय हत्यार कायदा 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com