शिवानी जोशी-पाठक यांना युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार

शिवानी जोशी-पाठक यांना युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार

जळगाव jalgaon

येथील कथ्यक कलावंत (Kathyak artist) शिवानी जोशी-पाठक (Shivani Joshi-Pathak) यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या (Manpower Development Public Service Academy) वतीने राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार 2021 (Adarsh Yuva Maharashtra Youth Idol Kalaratna Award) प्रदान करुन गौरविण्यात आले.

अकादमीतर्फे राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषदेचे ऑनलाईन आयोजन करुन पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा आणि संस्थापक अध्यक्ष ऍड.कृष्णाजी जगदाळे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले.

शिवानी या गेल्या 12 वर्षांपासून शास्त्रीय नृत्य कलेत सक्रिय आहेत. पुणे, इंदौर, मुंबई, देवरुख, अलिबाग येथे त्यांनी नृत्याविष्कार सादर केले आहेत. याच वर्षी गांधर्व विद्यालयातून विशारद पदवी घेऊन पद्मश्री डॉ. पुरु दधिच यांच्या कथ्यक शास्त्र पदव्युत्तर डिप्लोमामध्ये त्यांनी विशेष योग्यता श्रेणी संपादन केली आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदेत शिवानी यांनी शोध निबंधही सादर केला आहे. शिवानी या प्रभाकर संगीत कला अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थिंनी असून त्यांनी नृत्याचे प्रशिक्षण डॉ.अपर्णा भट-कासार यांच्याकडे घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com