ट्युबवेलचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
ट्युबवेलचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

जळगाव- jalgaon

वडिलांना शेतात फवारणीसाठी (field spraying) मदतीला गेलेल्या ज्ञानेश्वर सुभाष पाटील (वय- १९) रा. कुवारखेडा या तरुणाचा (youth) वीज खांबाला अाधार म्हणून लावलेल्या तारेचा शाॅक लागून मृत्यू (Death due to star shock) झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील कुवारखेडा येथील ज्ञानेश्वर पाटील हा तरुण वडिलांना मदत करण्यासाठी शेतात गेला होता. शेतात फवारणीसाठी पाण्याची टाकी भरायची असल्याने तो शेतातील ट्युबवेल सुरू करण्यासाठी गेला. त्याठिकाणी असलेल्या विजेच्या खांबावरून वीजप्रवाह ट्युबवेल मध्ये उतरल्यमुळे ज्ञानेश्वरचा ट्युबवेलला स्पर्श होताच त्याला जोरात शॉक लागला. यात ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना शेतात काम करणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी ज्ञानेश्वरला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करीत त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महावितरण विरोधात नातेवाईकांचा संताप

तरुणाचा मृत्यू होताच महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे तरूण युवकांचा मृत्यू झाल्याबद्दल नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात संताप केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चार बहिणीचा एकुलता एक भाऊ

शॉक लागून मृत्यू झालेला ज्ञानेश्वर हा चार बहिणीचा एकुलता एक भाऊ होता. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटूंबियांनी मनहेलवणारा आक्रोश केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com