अमळनेर रेल्वे स्थानकावर हृदयविकाराचा झटक्याने तरूणाचा मृत्यू

अमळनेर रेल्वे स्थानकावर हृदयविकाराचा झटक्याने तरूणाचा मृत्यू

अमळनेर - प्रतिनिधी amalner

भुसावळहून (bhusawal) नंदुरबारला (nandurbar) जात असताना अमळनेर रेल्वे स्थानकावर (Amalner Railway Station) हृदयविकाराचा (Heart disease) झटका येऊन फैजपूर (Faizpur) येथील 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर येथे घडली.

कय्युम अयुब खान (40 रा. फैजपूर मिल्लत नगर) आणि त्याचा मित्र अर्शद याच्यासोबत गुरुवारी सकाळी ८ वाजता नवजीवन एक्स्प्रेसने (Navjivan Express) भुसावळ रेल्वे स्थानकातून नंदुरबारकडे जात होता. धरणगाव (dharangaon) जवळ कय्युमला छातीत दुखू लागले.

अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिक त्रास झाल्याने त्याचा मित्र अर्शद याने त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ. काश ताडे यांनी तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच गावचे सामाजिक कार्यकर्ते राजू शेख, अशपाक शेख रऊफ पठाण, फयाज शेख नावेद शेख आदींनी फैजपूर येथील घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली.

अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पीएम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत कय्युम खान हा औषध विक्रेत्याचा (एमआर) व्यवसाय करायचा, त्याच्या मागे आई आणि ३ मुलीं असा परिवार होत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com