पाल येथे गॅलरीवरून कोसळल्याने तरुणाचा मृत्यू

पाल येथील घटना;घराला गळती लागल्याने प्लॅस्टिकचा कागद टाकण्यासाठी चढला होता तरुण
 पाल येथे गॅलरीवरून कोसळल्याने तरुणाचा मृत्यू

पाल Pal ता.रावेर (वार्ताहर)-

येथील ३२ वर्षीय तरुण (Youth) घराचे छत गळत असल्याने (roof of the house is leaking),गॅलरीवर (gallery) चढून प्लॅस्टिकच्या कागदाने ते झाकत असताना,खाली कोसळून पडला (Fell down) होता,यात त्याला जबर दुखापत झाली होती. साकेगांव येथे उपचारादरम्यान दुर्दैवी (death) मृत्यू झाल्याची घटना दि.१५ रोजी शुक्रवारी रात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की,दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने घराच्या छताला गळती लागल्याने,गळती रोखण्यासाठी छतावर प्लास्टिक कागद टाकण्यासाठी गॅलरीवर चढलेल्या पाल येथील भिकारी नबाब तडवी (वय-३२) हा कोसळून खाली पडल्याची घटना दि.१४ रोजी घडली होती.

यात डोक्याला जबर मार लागलेला असल्याने, त्याला साकेगांव येथील डॉ.उल्हास पाटील वैदकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता,दि.१५ रोजी त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मयताच्या पश्चात आई,भाऊ,बहीण,पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com