
पाचोरा - प्रतिनिधी pachora
पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील शेत शिवारात एका ३२ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लासुरे ता.पाचोरा येथील सुरज भारत देवरे (वय३२) हा तरुण गुजराथ येथे खाजगी वाहन चालकाची नौकरी करुन परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होता. गेल्या तीन दिवसांपुर्वी सुरज हा लासुरे येथे आला होता. दरम्यान १८ मे रोजी लासुरे येथील शेत शिवारात एक तरुण झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती वाणेगाव येथील शेतकऱ्याने दिल्यानंतर घटनास्थळ गाठले असता सुरज देवरे याने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले. सुरज यास पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी सुरज यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरज याचे पाश्चात्य सावत्र आई, एक भाऊ, एक बहीण असा परिवार असुन सुरज याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.