गावठी पिस्तुलासह तरूणाला अटक

जळगाव एलसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात
गावठी पिस्तुलासह तरूणाला अटक

यावल Yaswal ( प्रतिनिधी )

तालुक्यातुन गावठी पिस्तुलासह फिरत असलेल्या चिंचोली येथील तरूणाला जळगाव एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालक्यातील चिंचोली गावातील गणेश शिवाजी पाटील या तरूणाकडे गावठी पिस्तुल असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण खात्याच्या जळगाव येथील पथकाला मिळाली होती.

या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी पोहेकॉ शरद वसंतरावभालेराव, महेश महाजन, किरण मोहन धनगर आणि प्रमोद अरुण लाडवंजारी यांचे पथक तयार केले. या पथकाने चिंचोली तालुका यावल येथे जाऊन गणेश शिवाजी पाटील (वय२१, रा. रामानंद नगर, चिंचोली, तालुका यावल) याला शिताफीने ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. हे पिस्तुल जप्त करण्यात आले असून गणेश पाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरूध्द आर्म ऍक्टसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजीज शेख हे करीत आहेत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com