हिंगोण्याजवळ अपघातात तरुणाचा मृत्यू

आठवड्यातील दुसरी घटना
हिंगोण्याजवळ अपघातात तरुणाचा मृत्यू

हिंगोणा Hingona ता. यावल । वार्ताहर

बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर शंतनु पेट्रोल पंपाजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.18 रोजी रात्री 11 वाजता घडली. या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

थेरोळे (ता. रावेर) येथील रहिवासी मुकेश मरी अटकाळे (वय 32) हे त्यांच्या दुचाकी (क्र. एम एच 19 बि ई 4358)ने त्यांचे नातेवाईक मनवेल येथे जात असताना होते. हिंगोणा (Hingona) येथे शंतनु पेट्रोल पंपाजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळाल्यानंतर ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले.

त्यावेळी ग्रामस्थांनी 108 क्रमांकावर फोन लावून रुग्णवाहिका बोलावण्याचा प्रयत्न केला परंतु अपघात झाल्याच्या एक तासानंतरही रुग्णवाहिका (Ambulance) दाखल झाली नाही. रुग्णवाहिका ही अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी असल्याने अशा वेळीसुद्धा तब्बल एक तास उशिर झाला. आठवड्यातील ही दुसरी घटना असून प्रत्येक वेळेस रुग्णवाहिकेला यायला वेळ लागत आहे. दरम्यान या महामार्गाचे काम सुरू असून या दिशादर्शक फलक लावणे अपघातांच्या घटनांनंतर गरजेचे झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com