ट्रकवर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू

एमआयडीसीतील हॉटेल वासूमित्रा जवळील घटना; मयताच्या पत्नीला मानसिक धक्का
ट्रकवर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आपल्या मेडीकलवर (Medical) जात असतांना तरुणाची (Young man) दुचाकी (two-wheeler) ट्रकवर (truck) आदळल्याने (Collision) प्रवीण साईंदास पवार (Praveen Saindas Pawar) (वय 36, रा. अयोध्यानगर, जळगाव) या तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू (Death) झाल्याची घटना आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास हॉटेल वासूमित्राजवळ (Hotel Vasumitra) घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर (Jamner) तालुक्यातील पहुर येथील प्रवीण पवार हे अयोध्यानगरात (Ayodhya) आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. त्यांचे सुप्रिम कॉलनीत मेडीकल (Medical) असून ते आज सायंकाळी घरुन मेडीकलवर जाण्यासाठी निघाले. याचवेळी एमआयडीसी परिसरातील हॉटेल वासूमित्राजवळ थांबलेल्या ट्रकवर (truck) प्रवीण यांची दुचाकी आदळली. या अपघातात प्रवीण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ((MIDC Police)) ठाण्याचे कर्मचारी मुद्दस्सर काझी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवीण यांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी (relatives) शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर प्रवीण यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार (Treatment) सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.

पतीच्या अपघाताचा पत्नीला मानसिक धक्का

प्रवीण पवार यांचा अपघात झाल्याची कळताच त्यांची पत्नी वंदना (Wife Vandana) यांना मानसिक धक्का (Mental shock) बसला आहे. त्यामुळे वंदना यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. प्रवीण यांच्या पश्चात पत्नी वंदना, आई सुमित्रा, मुलगा गोलू, बहिण अश्विनी असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (Sudden death) नोंद करण्याचे काम सुरु होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com