शिर्डीला गेलेला जळगावातील तरुण बेपत्ता

चार दिवस उलटल्याने अखेर कुटुंबियांनी दिली पोलिसांत तक्रार
 शिर्डीला गेलेला जळगावातील तरुण बेपत्ता

जळगाव jalgaon

दुचाकीने शिर्डीला (Shirdi) जावून येतो असे सांगून ९ ऑक्टोंबरपासून घराबाहेर पडलेला आकाश पंढरीनाथ सपकाळे (आकाश पंढरीनाथ सपकाळे) (वय-२३ रा. राजमालती नगर, जळगाव) हा तरुण पुन्हा घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबियांनी मंगळवारी तो बेपत्ता (Disappeared) झाल्याबाबत शहर पोलीस ठाण्यात (City Police) तक्रार (Complaint) दिली आहे.

राजमालती नगरातील रहिवासी तरुण आकाश पंढरीनाथ सपकाळे (वय-२३) हा त्याची लाल रंगाची पल्सर मोटारसायकलने शिर्डी देवस्थानावर दर्शनासाठी जात असल्याचे सांगुन घरुन शनिवारी निघाला होता. रात्री ११ वाजेपर्यंत आकाश घरी परतला नाही. दुसर्‍या दिवशी आकाशच्या ८४८४८२३९३४ या क्रमांकावर संपर्क साधला असता, फोन लागत नव्हता.

तेव्हा पासुन त्याच्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे शोध घेवुनही त्याच्याबाबत काहीच माहिती मिळाला नाही. चार दिवस उलटूनही आकाश घरी न परतल्याने अखेर मंगळवारी आकाशचे वडील वडील पंढरीनाथ तंगु सपकाळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरुन बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उंची ५ फुट, रंग गोरा, दाढी, हातावर आई गोंधलेले असे आकाशचे वर्णन असुन कोणासही माहिती मिळाल्यास शहर पेालिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.