जळगावातील तरूणाचा सर्पदंशाने मृत्यू

शेतात काम करतांना सर्पदंश ; पाच दिवसांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
जळगावातील तरूणाचा सर्पदंशाने मृत्यू

जळगाव -jalgaon

शहरातील पिंप्राळा येथील कोळीवाड्यातील मुकेश भिवा सोनवणे (Mukesh Bhiva Sonawane) (वय-३०) या तरूणाला सर्पदंश (Snake bite) झाल्याने त्याच्यावर गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार (Treatment at District Government Medical College) सुरु होते. उपचार सुरु असतांना गुरूवारी पहाटे ५ वाजता तरूणाचा मृत्यू (Death) झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुकेश सोनवणे हा तरूण शेती काम करून उदरनिर्वाह भागवितो. आईवडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा अश्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते पिंप्राळा शिवारातील शेतात ट्रॅक्टरने टिलर करत असतांना लोखंडी नागरात कचरा अडकला होता. कचरा काढण्यासाठी मुकेश खाली उतरला होता. कचरा काढतांना कचर्‍यात असलेल्या सापाने त्यांच्या उजव्या हाताला दंश केला.

इतरांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. गुरूवारी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान मुकेश सोनवणे यांची प्राणज्योत मालवली.

मयत मुकेशच्या पश्चात वडील भिवा सोनवणे, आई सुशिलाबाई, भाऊ राकेश, दोन विवाहित बहिणी, पत्नी रेखा, मुलगा तन्मय आणि मुलगी प्राची असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने सोनवणे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com