ट्रॅक्टर उलटून तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर उलटून तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ तिरपोळे रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून (tractor overturns), ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने जामदा येथील तरुणाचा (Young man) जागीच मृत्यू (dies) झाला. मयत युवकाचा नुकताच साखरपुडा झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहन भाईदास सोनवणे(२६) रा.जामदा, ता.चाळीसगाव हा मेहुणबारे गावाजवळ तिरपोळे रस्त्यावरुन ट्रॅक्टरवर बसून जात असताना, ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले. या झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने मोहनचा जागीचा मृत्यू झाला.

मोहनचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. आणि आता घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती. अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला वैद्यकिय आधिकारी यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.अरुण पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com