कुटुंबियांना मारहाण झाल्याच्या संतापातून तरुणाची आत्महत्या

दहीगावसंत च्या तरुणाने म्हसावदजवळ रेल्वेखाली संपविले जीवन
कुटुंबियांना मारहाण झाल्याच्या संतापातून तरुणाची आत्महत्या

जळगाव jalgaon

किरकोळ कारणावरुन तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना (families) मारहाण (Beating) झाल्याच्या संतापात सागर गणेश खडसे (Sagar Ganesh Khadse) (वय २२, रा.दहिगाव संत, ता.पाचोरा) याने धावत्या रेल्वेसमोर(Railways) झोकून देत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता म्हसावद (Mhasavad), ता.जळगाव येथे घडली. दरम्यान, मुलाने आत्महत्या केली नसुन घातपात (Assassination) झाला असल्याचा आरोप मयत सागरच्या वडीलांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ वाजता म्हसावद येथे अपलाईनवर खांब क्र.३९४/११/१२ समोर धावत्या रेल्वेखाली झोकून देत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली.

म्हसावद दूरक्षेत्राचे स्वप्नील पाटील व हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती, मात्र गर्दी वाढल्याने दहिगाव संत येथील रहिवाश्यांनीच मृताला ओळखले, त्यानंतर त्याची ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

मुलाचा मृतदेह पाहून आई, वडीलांनी एकच हंबरडा फोडला. सोमवारी झालेल्या वादातूनच सागर याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर याच्या पश्चात, आई कल्पना, वडील गणेश महादेव खडसे, भाऊ समाधान असा परिवार आहे. गणेश खडसे हे रिक्षा चालक आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com