घरातून निघून गेलेल्या तरूणाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

ममुराबाद शिवारातील घटना; कुटूंबियांचा आक्रोश; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
घरातून निघून गेलेल्या तरूणाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

घरातून काहीही न सांगता निघून गेलेल्या (Gone without saying anything) दीपक खुशाल पाटील (वय-32, रा. चौघुले प्लॉट, रेल्वे लाईनजवळ) या तरुणाने (Young) ममुराबाद शिवारातील शेतातील विहिरीत (field well) उडी घेवून आत्महत्या (Suicide by jumping) केली. ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील चौघुले प्लॉटमधील रेल्वेलाईनजवळ दीपक पाटील हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते एमआयडीसीतील विक्रम इंडस्ट्रिज येथेे नोकरी करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवरुन घरी आल्यानंतर त्यांनी जेवण केले आणि त्यानंतर कोणाला काहीही न सांगता घरातून दुचाकी घेवून निघून गेले. त्यांनी आपली दुचाकी ममुराबाद रोडवर रस्त्याच्याकडेला लावून ममुराबाद शिवारातील नारायण झिपरु फेगडे यांच्या शेतातील विहरीत दीपक यांनी उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

नातेवाईकांच्या मदतीने काढला मृतदेह बाहेर

विहरीत दीपक यांचा मृतदेह दिसताच त्यांनी या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, सफौ माणिक पाटील व साहेबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या मदतीने विहरीतून बाहेर काढण्यात आला.

दुचाकीवरुन उघडकीस आली घटना

रात्री उशिरापर्यंत दीपक हे घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरु होता. मात्र ते रात्री मिळून आले नाही. दरम्यान, सकाळी त्यांचे नातेवाईक व कुटुंबिय शोध घेत असतांना त्यांना दीपक यांची (एमएच 19 बीएक्स 6397) क्रमांकाची दुचाकी ममुराबाद रोडवर रस्त्याच्याकडेला उभी असल्याचे दिसले. त्यांनी शेतात जावून बघितले असता दीपक यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला.

आत्महत्येपुर्वी कठड्यावर ठेवला मोबाईल

दीपक यांनी विहरीत आत्महत्या करण्यापुर्वी आपला मोबाईल विहरीच्या कठड्यावर ठेवला होता. दरम्यान, शोध घेत असतांना दीपकचे काका सुरेश डिगंबर पाटील व भाऊ दिनेश पाटील यांनी मृतदेहाची ओळख पटवून मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविला. दीपक यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com