अल्पवयीन मुलीस पळविणार्‍या तरुणाला अटक

मुलगी सुखरुप कुटुंबियांच्या स्वाधीन
अल्पवयीन मुलीस पळविणार्‍या तरुणाला अटक

जळगाव -jalgaon

शहरातील रामानंद नगर पोलीस (Ramanand Nagar Police)ठाण्याच्या हद्दीतून १७ वर्षीय मुलीला (girl)फूस लावून पळविणार्‍या संशयित गोपीचंद गोविंदा भिल (Gopichand Govinda Bhil) वय १८ रा. टाकरखेडा ता.धरणगाव याला शनिवारी रामानंदनगर पोलिसांनी धुळ्यातून अटक (Arrested) केली आहे.

जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील एका भागातील १७ वर्षीय मुलगी १४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने तिला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून दिल्याची तक्रार बुधवार, १५ सप्टेंबर रोजी बेपत्ता मुलीच्या आईने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

रामानंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी, अजय सपकाळे, स्वाती पाटील या कर्मचार्‍यांच्या पथकाकडून अहमदनगर, शिर्डी, श्रीगोंदा याठिकाणी मुलीसह संशयिताचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाही.

शनिवारी संशयित तरुण हा एका ओमनी कारने मुलीला सोबत घेवून धुळ्याकडे जात असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने धुळे गाठले. तेथील स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पाठलाग करुन संशयित दिपक याच्यासह मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने अल्पवयीन मुलीस तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com