नापिकीमुळे तरुण शेतकर्‍याची विषारी द्रव्य सेवन करुन आत्महत्या

नापिकीमुळे तरुण शेतकर्‍याची विषारी द्रव्य सेवन करुन आत्महत्या

उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत; अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शेतातून निम्मे देखील उत्पन्न मिळत नसल्याने (Not getting income) हवालदिल झालेल्या तसेच कर्जबाजारीपणाला (Debt settlement) कंटाळून तरुण शेतकर्‍याने (young farmer) शेतात फवारणीचे औषध (poisonous) पिवून आत्महत्त्या (suicide) केली. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालवली. नितीन गणेश राणे (वय-36, रा. वरखेड ता. बोदवड) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील वरखेड येथे नितीन गणेश राणे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांची गावातच शेती असून शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. मागील वर्षी शेतात कपाशीची लागवड केली होती. परंतु त्यातून निम्म उत्पन्न देखील (Not getting income) मिळाले नाही.

त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर (Debt settlement) असल्याने नितीन राणे यांनी दि. 5 रोजी शेतातच फवारणीचे औषध (poisonous) पिवून आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला. दरम्यान, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना दि. 10 रोजी सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com