
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे अतिसार आणि संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत गावाला (villages) पाणीपुरवठा करणार्या जलस्त्रोतांचे (water sources) सर्वेक्षण करण्यात येत असते. त्याचा नोव्हेंबर महिन्याचा अहवाल प्राप्त झाला असून जिल्ह्यातील 38 गावांना पिण्याचा पाणीपुरवठा दूषित होत असल्याची बाब समोर आली आहे. तसा अहवाल पाणी नमुने तपासणी करणार्या जिल्हा प्रयोगशाळेकडून देखील आला आहे. जळगाव जिल्ह्यात 929 गावांना सध्या शुध्द पाणी मिळत आहे. दरम्यान, जलस्त्रोत 35 ते 75 टक्के अशुध्द असलेल्या ऑक्टोबर महिन्याच्या अहवालानुसार 65 ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) ‘यलो कार्ड’ ('Yellow card')देण्यात आले आहे.
ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, अशुध्द पाण्यामुळे अतिसाराची लागण होवू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दर महिन्याला प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राच्या अंतर्गत येणार्या गावांचे जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांचे पाणी नमुने जिल्ह्याच्या प्रयोग शाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येत असतात. यात नोव्हेंबर महिन्यात 38 गावांना अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नोव्हेंबरमध्ये सादर झाल्यानंतर त्यात 65 गावांना यलो कार्ड देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य कर्मचार्यांना त्यांच्या अखत्यारीत गावाला पाणीपुरवठा करणार्या जलस्त्रोताचे नमुणे घ्यावे लागतात. त्या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येते.
सदर पाणी पिण्या योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते. ज्या गावांचे पाणी स्त्रोत 75 टक्के दूषित आहे, अशा गावांच्या ग्रामपंचायतीला रेड कार्ड दिले जाते. तर ज्या गावांमध्ये 35 टक्के खाली जलस्त्रोत दूषित असल्यास त्यांना हिरवेकार्ड दिले जाते. 35 ते 75 टक्के जलस्त्रोत दूषित राहिल्यास त्या गावांच्या ग्रामपंचायतीला यलो कार्ड दिले जाते.
ग्रामपंचायतीला उपायोजनांच्या सूचना
ज्या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाणी पिण्या योग्य नाही अशा गावांच्या ग्रामपंचायतींना गावातील नादुरूस्त व्हाल्व दुरूस्त करणे, गावातील गळत्या रोखणे, ज्या भागातून जलवाहिनी गेली आहे त्या भागातील उकीरेडे उचलण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. तसेच जलकुंभामध्ये लम, तुरटी टाकून पाणी शुध्द देण्याबाबत उपाययोजना केल्या आहे. 77 प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सर्वेक्षण जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमधीेल जलस्त्रोतांचे नमुने घेण्यात आले आहे.
त्यात सर्वाधिक 16 गावे मुक्ताईनगर तालुक्यातील असून या गावांना यलो कार्ड देण्यात आले आहे. चाळीसगाव व धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी 8 गावांचा समावेश आहे. चोपडा व पारोळा तालुक्यातील सर्वच गावांना शुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे अहवालावरून समोर आले आहे.
यलो कार्डमध्ये समावेश असलेले गाव
जिल्ह्यातील 38 गावांना सध्या अशुध्द पाणी पुरवठा होत असून यात सर्वाधिक 11 गावे चाळीसगाव तालुक्यातील आहेत. यात दहीवद, मेहुणबारे नवेगाव, मेहुणबारे जुनेगाव, दसेगाव, लोंढे,चिंचगव्हाण, विसापुर, कोदगाव, वलठाण, जामडी, कोंगनगर या गावांचा समावेश आहे. येवती ता.बोदवड, हिंगोणे बु.हिंगोणे खु. ता.धरणगाव, कढोली,खेडी खु.टाकरखेडा,उत्राण उह,उत्राण गुह ता.एरंडोल, शिरसोली प्र, लोणवाडी ता.जळगाव, मोरगाव, टाकरखेडा, लोंध्री बु. ता. जामनेर, नरवेल, डोलारखेडा ता.मुक्ताईनगर, धुळपींप्री, सावखेडे, टीटवी, टीटवी सीम, चाहुत्रे ता.पारोळा, रसलपूर, नांदुरखेडा, कांडवेल, भोर, विवरे बु,, वाघोड ता.रावेर, सावखेडा ता.यावल या गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 929 गावांना शुध्द पाणी
जिल्ह्यात दरवर्षी पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांची तपासणी केली जाते. सतत पाच वर्षापर्यंत ज्या गावात पाण्यापासून कुठलीही साथ लागली नाही. अतिसार अथवा कोणती ही रोगराई आली नाही. अशा गावांना दर पाच वर्षानंतर सिल्व्हर कार्ड दिले जाते. यात 929 गावांचा समावेश आहे.