
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
ग्रामीण भागात (rural areas) नागरिकांना (citizens) अशुध्द पाण्यामुळे अतिसाराची लागण (Infection with diarrhea) होवू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) आरोग्य विभागाकडून (Health Department) दर महिन्याला प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राच्या अंतर्गत येणार्या गावांचे जलस्त्रोतांचे सर्वेक्षण (Survey of Water Resources) करून त्यांचे पाणी नमुने प्रयोग शाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येते. यात फेब्रुवारी महिन्यात 31 गावांना अशुध्द पाणी पुरवठा (Impure water supply) होत असल्याची बाब समोर आली आहे. यापुर्वी जळगाव जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नोव्हेंबरमध्ये सादर झाला होता. त्यात 65 गावांना यलो कार्ड देण्यात आलेले आहे.
ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण व संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावाला पाणीपुरवठा करणार्या जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येत असते.
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दर महिन्याला प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राच्या अंतर्गत येणार्या गावांचे जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांचे पाणी नमुने जिल्ह्याच्या प्रयोग शाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येऊन त्याचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात पाठविण्यात आला असून यात 31 गावांना अशुध्द पाणी पुरवठा होत असल्याची बाब समोर आलेली आहे.
जिल्ह्यात दरवर्षी पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांची तपासणी करुन सतत पाच वर्षापर्यंत ज्या गावात पाण्यापासुन कुठली ही लागण लागली नाही. अतिसार अथवा कोणती ही रोगराई गावात आलेली नाही, अशा गावांना दर पाच वर्षानंतर सिल्व्हर कार्ड दिले जाते. यात 929 गावांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमधील जलस्त्रोतांचे नमुने घेण्यात आले आहे.त्यात सर्वाधिक 6 गावे रावेर तालुक्यातील आहेत. तर अमळनेर व जळगाव तालुक्यातील प्रत्येकी 4 गावांचा समावेश आहे. चाळीसगाव व भुसावळ तालुक्यातील सर्वच गावांना शुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे अहवालावरून समोर आलेले आहे.
अशुध्द पाणीपुरवठा होणारी गावे
जिल्ह्यातील 31 गावांना सध्या अशुध्द पाणी पुरवठा होत असून यात सर्वाधिक 6 गावे रावेर तालुक्यातील आहेत. यामध्येत कुंभारखेडा, बोरखेडासिम, कुसुंबा खु, कुसुंबा बु, कठोरा, धुरखेडा, कोळदा या गावांचा समावेश आहे. तर अमळनेर तालुक्यातील खेडी खु., नंदगाव, पळासदळ, टाकरखेडा, जळगाव तालुक्यातील विटनेर, तांडा, वराड, सुभाषवाडी आणि भडगाव तालुक्यातील बांबरूड, तर बोदवड तालुक्यातील करंजी,धानोरी,धोंडखेडा, चोपडा तालुक्यातील मोहीदा, उजाड कर्जाने तर धरणगाव तालुक्यातील रोटवद, कंडारी बु,आणि जानफळ ता.एरंडोल, तिघ्रे,टाकळी ता.जामनेर, कोठा ता.मुक्ताईनगर, खाजोळे ता.पाचोरा, होलसर, कामतवाडी ता.पारोळ, कठोरा ता.यावल या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे.