यावलचा ‘ तो’ राजकीय भूकंप होता होता राहीला : वरिष्ठांच्या शिष्टाईने राजीनामास्त्र ‘ म्यान’

यावलचा ‘ तो’ राजकीय भूकंप होता होता राहीला : वरिष्ठांच्या शिष्टाईने राजीनामास्त्र ‘ म्यान’

अरूण पाटील

यावल Yaval ( प्रतिनिधी )

गेल्या दोन दिवसापासून यावल तालुक्यात राजकीय भूकंप (Political earthquake) होण्याच्या हालचाली वेगवान होत असतांनाच वरिष्ठांनी (seniors) वेळीच केलेल्या शिष्टाईने (Politely) हा ‘ राजकीय भूकंप’ होता होता राहीला. 31 डिसेंबरच्या सायंकाळी वर्ष अखेर साजरा करत राजीनामा (Resigned) नाट्यावर पडदा (curtain on the play) पडला. राजीनामा नाट्यावर पडदा पडला असला तरी मात्र आता यावलच्या राजकीय पटलावर मात्र नवा पायंडा पडला.

एका राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा त्यांच्या तालुका अध्यक्षांकडे दिलेला होता. या राजीनामा नाट्यावर तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू असताना दिनांक 31 डिसेंबर शुक्रवार रोजी या पक्षाच्या अध्यक्ष, सचिव व प्रमुख कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये अखेर राजीनामा देणार्‍या पदाधिकार्‍यांचे मन परिवर्तन करण्यात यश आले. दिलेला राजीनामा परत घेण्यात आला. त्यामुळे आता या प्रकरणावर पडदा पडला आहे.

देशदूतच्या वृत्तामुळे शिष्टाईसाठी पक्ष श्रेष्टी यावलमध्ये

यावल तालुक्यातील राजीनामा देणार्‍या पदाधिकार्‍यांच्या या प्रकरणी दैनिक देशदूत मधून सलग दोन दिवस वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावृत्तामुळे यावलच्या राजकीय पटलावर मोठी खळबळ उडाली होती. तर विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेतेही या पदाधिकार्‍याच्या भेटीसाठी यावलमध्ये दाखल होणार असल्याचे वृत्तही यावलमध्ये धडकले होते.

गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात सर्वत्र या राजकीय भुकंपा बाबत चर्चेला उधाण आले होते. या पदाधिकार्‍यांशी विविध पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनीही संपर्क साधून आमच्याकडे आल्यास आपली स्वागतच केले जाईल असे सांगितले होते मात्र ज्या पक्षाने मला मोठे केले तिकीट दिले व पदही दिले त्याच्याशी गद्दारी करणार नाही ही भूमिका बजावत राजीनामा देणार्या त्या पदाधिकार्‍यांनी अखेर त्यांच्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांना समोर ठेवून दोन्ही बाजूंनी चर्चा झाल्यात त्यात जे मनोमनी केले गेले. या मनोमिलानामुळे या प्रकरणावर शेवटी पडदा पडत आता या राजकीय भूकंपाला पूर्णविराम मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com