यावल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

यावल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

यावल - पतिनिधी Yaval

यावल तहसील कार्यालयामध्ये (Tehsil Office) अव्वल कारकून मुक्तार तडवी यांना पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.

शेतजमीन खरेदी-विक्री दाव्यातील निकालाच्या नकला देण्याकामी शासकीय फी व्यतिरिक्त पाचशे रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारणाऱ्या कोषागार अव्वल कारकुणास एसीबीच्या पथकाने आज अटक केली.

पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com