Video # अरे व्वा बस स्थानकाचे चक्क तलावात रूपांतर..

Video # अरे व्वा बस स्थानकाचे चक्क तलावात रूपांतर..

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

जळगाव शहरानंतर सर्वाधिक वर्दळ (The busiest) व उत्पन्न असलेल्या भुसावळ बस स्थानकाची (Bhusawal bus stand) पहिल्याच पावसात प्रचंड दैना (Huge misery in the first rain) झाली असुन तलाव सदृष्य स्थिती (Pond-like conditions) निर्माण झाली आहे

सुमारे 50 खेड्यांचे जाळे, राज्यभर वाहतूक इतकेच नव्हे तर मध्यप्रदेश व गुजराथ राज्यांमध्ये बससेवा देणार्‍या भुसावळ बस स्थानकातून अहोरात्र शेकडो बसेस जातात व येतात यामुळे दिवसाकाठी हजारो प्रवाशांची रेलचेल येथे असते काल (दि. 4) रोजी रात्रभर शहरात रिपरिप पाऊस झाला. या पहिल्याच पावसात बस स्थानकाच्या सुमारे 60 टक्के भाग हा पाण्याने व्यापला.

पाण्याला निचरा व्हायलाच योग्य ती जागा नसल्याने लहान मोठे खड्डे भरले व ते सगळे एकमेकांना मिळाल्यामुळे या स्थानकाने एका मोठ्या तलावाचे रूप धारण केले आहे. या ठिकाणी आज रोजी चालकाला बस उभी करण्यास अथवा बाहेर पडण्यास जागाच शिल्लक नाही.

प्रवाशांचे तर विचारूच नका जे शेड आहे ती एक मोठी कचरापेटी झाली आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने नाईलाजाने प्रवाशांना या शेडचा आसरा घ्यावा लागत आहे. महिलावर्ग व वृध्दांचे मोठे हाल या स्थानकात होत असून दुर्दैवाची बाब म्हणजे या समस्येवर कुणीही काहीही उपाययोजना करतांना दिसून येत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्रस्त प्रवाशी त्यांच्या नावाने शिमगा करित आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com