अरेच्च्या.. आता भन्तेजीही नकली...

नकली भन्तेजीपासून सावधान राहण्याचे भन्ते दिपंकर महाथेरो यांचे आवाहन
अरेच्च्या.. आता भन्तेजीही नकली...

वरणगाव फॅक्टरी, (Varangaon Factory) ता. भुसावळ (वार्ताहर) -

सध्या आपल्या देशात नकली (fake) भन्तेजी (Bhante) ची निर्मिती झाली असून त्यांच्या पासून सावधान (careful) राहण्याचा इशारा चैत्यभूमी दादरचे भन्तेजी दीपंकर महाथेरो (Bhante Dipak Mahathero) यांनी केले आहे.

वरणगाव फॅक्टरी नगर मधील श्रवणधारा बुद्ध विहारात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. येथील दर्यापूर शिवारात असलेल्या या विहारांमध्ये भिक्खू संघास भोजन (Bhikkhu Sanghas food) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी चांगदेव श्रामनेर शिबिरातील भावी ३३ भन्तेजी तसेच भारतीय बौद्ध महासभेचे (Indian Buddhist Congress) जनार्दन बोदडे सहीत कार्यकर्ते उपस्थित होते.

भन्तेजींची पायी मिरवणूक यावेळी काढण्यात आली होती. प्रसंगी भिक्कू संघाचे प्रशिक्षक मार्गदर्शक अर्पुन तायडे गुरुजी यांनी बौद्ध धर्म व आजचा समाज या विषयी मार्गदर्शन केले. तसेच महाथेरो दीपंकर यांनी सध्या आपल्या देशात नकली भन्तेजी (Fake Bhanteji) यांची निर्मिती झाली असून त्यापासून सावधान (careful) राहण्याचे आवाहन केले.

यशस्वीतेसाठी रमाई नगरातील सी.जी निकम, पी. बी. मोरे, अशोक तायडे, महेंद्र तायडे, पी. जी. सोनवणे, गाढे बंधू, मिलींद गायकवाड, ग्रा, पं. सदस्या कुसुम गायकवाड, उपासक, उपासिका यांनी परिश्रम घेतले,

Related Stories

No stories found.