अरे व्वा जळगाव जिल्ह्यात 31 जातीच्या पक्षांचा रहीवास

निसर्गमित्रतर्फे द ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटचा उपक्रम
अरे व्वा जळगाव जिल्ह्यात 31 जातीच्या पक्षांचा रहीवास

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

निसर्गमित्र जळगाव ई-बर्ड इंडियातर्फे (Nisargamitra Jalgaon E-Bird India) दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील सलग चार दिवस कॅम्पस बर्ड काउंट (Bird Count (CBC)) (सीबीसी) आणि ग्रेट ब्याक यार्ड बर्ड काउंट (Great back yard bird count) (जीबीबीसी) हा उपक्रम दि.17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आला. यात वेगवेगळ्या प्रकारचे 31 जातीच्या 320 पक्षांची नोंद करण्यात आली आहे.

निसर्गमित्र जळगावतर्फे यावर्षी देखील पक्षी निरीक्षण आणि पक्षी गणना हा उपक्रम जळगाव येथे चार ठिकाणी घेण्यात आला. एखाद्या संस्थेचे आवार आणि पाणथळ, नदीकाठ, शेती-गवताळ भाग याशिवाय निवास स्थानाचे परस अंगण आसपासची अन्य खुली जागा अशा मिश्र ठिकाणी पक्षी निरीक्षण व पक्षी गणना करण्यात आली.

या पक्षी गणनेत कावळा,चिमणी,मैना,पोपट,कबुतर,बुलबुल या स्थानिक पक्ष्यांबरोबर गुलाबी मैना, दगडी गप्पीदास, आशियाई आणि लाल छातीचा माशीमार, काळा थिरथिरा, तुतार्‍या, धोबी, चक्रवाक अशा काही देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झाली.

अरे व्वा जळगाव जिल्ह्यात 31 जातीच्या पक्षांचा रहीवास
कारच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू
अरे व्वा जळगाव जिल्ह्यात 31 जातीच्या पक्षांचा रहीवास
सावधान : सौदर्यप्रसाधने घेताय... तर ही बातमी महिला व ब्युटीपार्लर चालकांनी वाचलीच पाहीजे

17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पक्षी गणना आणि कॅम्पस बर्ड काउंट उपक्रम राबविण्यात आला. यात 17 फेब्रवारी रोजी कण्व आश्रम,कानळदा 40 जातीचे पक्षी व 235पक्ष्यांची नोंद करण्यात आली. दि.18 रोजी स्मृती उद्यान, मेहरूण येथे 25 जातीचे पक्षी व 105 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. दि.19 रोजी गार्बेज डेपो, शिवाजीनगर येथे 36 जातीचे पक्षी आणि 221 पक्ष्यांची नोंद झाली. दि.20 रोजी कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद येथे 32 जातीचे पक्षी, 135 पक्ष्यांची नोंद झाली.

द ग्रेट बैकयार्ड बर्ड काउंट उपक्रम कानळदा रोड,जळगाव, शंभू हिल्स,रायसोनी नगर, निमखेडी,गिरणा नदी, शिरसोली पी.बी. तलाव, पक्षी निरीक्षण केले. निसर्गमित्र जळगावतर्फे पुढील वर्षीही या उपक्रमाला असाच प्रतिसाद मिळेल,असा आशावाद पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी व्यक्त केला.

अरे व्वा जळगाव जिल्ह्यात 31 जातीच्या पक्षांचा रहीवास
आपल्या टिव्ही चॅनल्सची ही दरवाढ पाहीली का ?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com