चिंताजनक: नववर्षात जिल्ह्यात कोरोनाचा धोका

चिंताजनक: नववर्षात जिल्ह्यात कोरोनाचा धोका

दिवसभरात आढळले 16 नवे बाधित; तिसर्‍या लाटेतील नवीन वर्षातील विक्रमी रुग्णांची नोंद

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची (Corona affected) संख्या मंदावली होती. मात्र सोमवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये कोरोनाचे (Corona) तब्बल 16 नवे बाधित रुग्ण (Newly infected patients) आढळून आल्याने जिल्ह्याला नवीन वर्षात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका (Danger of the third wave) निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या मंदावली होती. त्यामुळे राज्यासह जिल्हाभरात शासनाने व प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध शिथील करण्यात आले होते. मात्र नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय मेळावे, सामाजिक कार्यक्रमांसह लग्न सोहळे होवू लागले होते. परंतु आता हेच राजकीय मेळावे, लग्न सोहळे घातक ठरत असून जिल्ह्याला तिसर्‍या लाटेचा धोका उद्धभवू लागला आहे. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून मंदावलेला कोरोनाचा आकडा गेल्या तीन चार दिवसांपासून वाढत आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज होणारी वाढ आता चिंताजनक ठरु लागली आहे. दरम्यान, आज दिवसभरात कोरोनाचे जिल्ह्यात 16 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 5, भुसावळात 6, चोपडा 1, चाळीसगाव 2 तर मुक्ताईनगरात 2 असे एकूण 16 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही 1 लाख 42 हजार 854 इतकी झाली असून 1 लाख 40 हजार 236 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच केवळ एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असल्याने आतापर्यंत 2 हजार 579 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असल्याची असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची वाढ चिंताजनक

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही दहाच्या आत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे. सद्यस्थितीला तीनच दिवसात जिल्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 39 वर पोहचल्याने ही बाबत चिंताजनक ठरू लागली आहे.

नवीन वर्षातील रुग्णांची विक्रमी नोंद

गेल्या दोन वर्षांपासून देशभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. अनेकांचे कुटुंब उद्धवस्थ झाले असून अनेकांचा आधार कोरोनामुळे हिरावला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून देशातील परिस्थिती पुर्वपदावर येत असल्याने शासनाकडून निर्बंध शिथील करण्यात आले होते. मात्र नवीन वर्षात कोरोनाची तिसर्‍या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. दि. 30 रोजी जिल्ह्यात 9, दि. 31 रोजी 1, दि. 1 रोजी 6, दि. 2 रोजी 5 तर दि. 3 रोजी नवीन वर्षातील सर्वाधिक म्हणजेच 16 रुग्णांची विक्रमी नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात निर्बंध कडक होण्याची शक्यता?

जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता चांगलीच वाढलेली आहे. जिल्ह्यात तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून संपुर्ण तयारी करण्यात आली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु तरी देखील बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्याबाबतचे आदेश लवकरच होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com