चिंताजनक: जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच

दिवसभरात कोरोनाचे 88 नव्या रुग्णांची नोंद; आठवड्याभरात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या दोनशेपार
चिंताजनक: जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची (Corona affected) संख्या मंदावली होती. मात्र आठवडाभरापासून जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दिवसभरात कोरोनाच्या 88 नव्या रुग्णंची नोंद (Record of new patients) झाली असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतच चालला असल्याने जिल्हा प्रशासनाची (District Administration) चिंता चांगलीच वाढलेली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर आता तिसर्‍या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. तिसर्‍या लाटेत कोरोनाचे रौद्ररुप पाहावयास मिळत आहे. आठवड्याभरात जिल्हयात कोरोनाचा उद्रेक झाला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे 88 नवे बाधित रुग्ण आढळून आले आल्याने जिल्हा प्रशासनाची नाची चिंता चांगलीच वाढलेली आहे. बुधवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरात 31, भुसावळ 24, , चोपडा 27, यावल 2, रावेर 1, चाळीसगाव 3 असे एकूण 88 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ही 1 लाख 43 हजार 040 इतकी झाली असून 1 लाख 40 हजार 238 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 2 हजार 579 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असल्याची असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

आठवड्याभरात अ‍ॅक्टीव्ह

रुग्ण दोनशेपार

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी असल्याने कोरोनाचा भिती कमी झाली होती. मात्र गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. दरम्यान, शुक्रवारी नवीन 88 रुग्णांची भर पडल्याने आता जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 223 वर पोहचली असल्याने प्रशासनाकडून निर्बंध वाढविण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com