जागतिक वारसा दिन विशेष : दक्षिण भारतानंतर दोन शिवलिंग एकाच ठिकाणी स्थापन केलेले रामेश्वर महादेव मंदिर!

सुमारे १२ लक्ष ५० हजार वर्षांपुर्वीचे आहे मंदिर
जागतिक वारसा दिन विशेष : दक्षिण भारतानंतर दोन शिवलिंग एकाच ठिकाणी स्थापन केलेले रामेश्वर महादेव मंदिर!

जळगाव - jalgaon

प्रभू श्रीरामचंद (Shriram) व लक्ष्मण वनवासादरम्यान येथे मुक्कामी थांबले असता त्यांनी याठिकाणी वेगवेगळे दोन शिवलिंग (Shivling) स्थापन केले आहेत. या पवित्र तपोभूमीत विश्वामित्र ऋषींनी (Vishwamitra Rishi) रामरक्षा यज्ञ याच मंदिराशेजारी केला होता. आजही खोदकाम केले असता त्या जमिनीतून रामरक्षा निघते असे सांगितले जाते.

राजा दशरथाचा दशक्रिया विधी सुध्दा याच ठिकाणी झाल्याचा ‘तापीपुराण’ या ग्रंथात उल्लेख आहे.

तीन नद्यांचा हा त्रिवेणी संगम ‘ओम’ आकाराचा आहे. ॐ ओम आकाराच्या तीनही नद्यांचा आकार व ओमवरील चंद्रकोरच्या अनुस्वाराच्या जागी हे मंदिर आहे.

दक्षिण भारतानंतर दोन शिवलिंग एकाच ठिकाणी स्थापन केलेले हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी श्रावण मास, महाशिवरात्रीला याठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

Related Stories

No stories found.