जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मजुराचा मृत्यू

नातेवाईकांचा आरोप; कारवाईची मागणी
जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मजुराचा मृत्यू

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात (District Medical Hospital) उपचार सुरु असतांना अवचित काळू तायडे (Avachit Kalu Tayde) (वय-46, रा. समतानगर) यांचा सोमवारी 11 वाजेच्या सुमारास मृत्यू (Death) झाला. डॉक्टरांच्या (doctor) दुर्लक्षामुळे (negligence) आणि हलगर्जीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप (Allegations) त्यांच्या नातेवाईकांनी (relatives) केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई (Action) करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शहरातील समता नगरातील रहिवासी अवचित तायडे हे मजुरी काम करुन उदनिर्वाह करतात. सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. डाव्या बाजूने पॅरालिसिस (Paralysis) सारखा त्रास होत असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात (District Medical Hospital) दाखल केले होते. परंतु सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांचा मृत्यू (Death) झाल्याने आज मयत अवचित तायडे यांच्या नातेवाईकांनी (relatives) जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली.

यावेळी डॉक्टरांनी पाहिजे ते उपचार (Treatment) अवचित तायडे यांच्यावर करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी दिवसभर केवळ सलाइन लावून ठेवले तर रात्री ऑक्सिजन (Oxygen) लावला मात्र ऑक्सिजनची नळही मशीनला न लावता जमिनीवर पडलेली असल्याचे दिसली. त्याचा व्हिडिओसुद्धा नातेवाईकांकडे आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अचानक हॉस्पीटलमध्ये मेंदूचा डॉक्टर (brain doctor) नसल्याचे उत्तर नातेवाईकांना दिले तसेच त्यांना दुसर्‍या ठिकाणी हलवाव लागेल असे सांगितले. याच दरम्यान अवचित तायडे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला.

नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी

डॉक्टरांनी दिवसभर कुठलेही उपचार केले नाही तसेच रुग्णाकडे लक्षही (Attention to the patient) दिले नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अवचित तायडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत अवचित तायडे यांचे जावई सुनील पवार, भाचा विकास अडकमोल, पुतण्या उत्तम तायडे यांनी केला आहे. संबंधित डॉक्टर तसेच कर्मचार्‍यांवर कारवाई (Action) करावी अशी मागणीही माहीत अवचित तायडे यांच्या नातेवाईकांनी केली असून याबाबत पोलिसांत (police) तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) जिल्हा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन (Movement) करेल असा इशाराही या वेळी महानगराध्यक्ष अडकमोल यांनी दिला आहे. मयत अवचित तायडे यांच्या पश्चात पत्नी शारदा , मुलगा राहुल तसेच विवाहित मुलगी असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com