बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना तुरुंगात पाठवा ; दक्षता समितीची मागणी

भडगाव पो.स्टे.ला निवेदन देताना महिला दक्षता समिती अध्यक्षा योजना
भडगाव पो.स्टे.ला निवेदन देताना महिला दक्षता समिती अध्यक्षा योजना

भडगाव - प्रतिनिधी bhadgaon

गुजरात (Gujarat) दंगलीत बिल्कीस बानो (Bilkis Bano) यांच्यावर सामूहिक अत्याचार करून त्यांच्या मूलांसहित नातेवाइकांची हत्या केली. सदर प्रकरणी अकरा दोषींना सत्र न्यायालय (Session Court) व सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जन्मठेपेची शिक्षा दिली असतांना गुजरात सरकारने (Gujarat Govt) त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयात दुरुत्ती करावी. हा निर्णय रद्द करावा. सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना आजीवन कारावास शिक्षेसाठी पुन्हा तुरुंगात पाठवावे. आणि या प्रकरणास न्याय मिळावा अशा मागणीचे निवेदन भडगाव पो. स्टे. महिला दक्षता समिती अध्यक्षा योजना पाटील, उपाध्यक्षा मिना बाग सह आदि सदस्यांनी पोलिस (police) निरीक्षक अशोक उतेकर, नायब तहसीलदार रमेश देवकर यांना दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com