जळगावातील खड्डे बुजविण्यासाठी नारीशक्तीचा पुढाकार

बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन रस्ते दुरूस्तीसाठी सरसावले
जळगावातील खड्डे बुजविण्यासाठी नारीशक्तीचा पुढाकार

जळगाव ( Jalgaon) -

शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून (municipal administration) कुठलेही काम होत नसल्याने रस्ते दुरूस्तीसाठी स्वयंसेवी संस्था रस्त्यावर उतरल्या आहेत. बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन (Box of Help Foundation) व खान्देश युवक बिरादरी (Khandesh Yuvak Biradari) यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक (Kavyaratnavali Chowk) ते आकाशवाणी (Akashwani) तसेच आशाबाबा नगर (Ashababa Nagar) येथील रस्त्यांमधील खड्डे बुजविण्यात आले. इतर कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करणार्‍या महापालिकेला आता तरी जाग येवून रस्त्यांची दुरूस्ती होईल का, असा ही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

खड्डेमय रस्त्यांमुळे जळगाव शहराची खड्डयांचे शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक संघटनासह राजकीय पदाधिकार्‍यांकडून वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करण्यात येत आहे. मात्र त्याचा कुठलाही परिणाम होत नाहीये. विशेष म्हणजे सत्तेत सहभागी पक्षाला रस्त्यांसाठी आंदोलन करावे लागले, त्यानंतर रस्ते जैसे थेच आहे. दोन दिवसांपूर्वी चक्क एका सामाजिक कार्यकर्त्याने माझी किडनी विका व मिळालेल्या पैशांमधून रस्त्याची दुरूस्ती करा असे भावनिक साकडे जिल्हाधिकार्‍यांना घातले होते.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आता बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन रस्त्यावर उतरले आहे. फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी प्रत्येकी २०० रुपये गोळा करत स्वतःच्या हाताने जळगावातील काव्य रत्नावली चौक ते आकाशवाणी चौक रस्त्यादरम्यानची खड्डे बुजविली. त्यानंतर आशाबाबानगरातील खड्डेही बुजविण्यात आले.

फाउंडेशनतर्फे शहरातील इतर ठिकाणचे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहे. याप्रसंगी बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा काबरा, मिनल लाठी, सीमा जाखेटे, लिना परमार, राधा झंवर, निधी भटळ, शैला मुंदडा यांच्यासह सदस्य उपस्थित होते. जळगावकर कर भर असतांनाही त्याच्या नशीबी खड्डेमय रस्ते आले आहेत. आता सामाजिक संघटनांकडून रस्त्यांतील खड्डे बुजविण्यात येत असल्याने कुंभकर्णी झोपेच सोंग घेणार्‍या महापालिका प्रशासनाकडून आता तरी रस्त्यांची दुरूस्ती करुन देईल का? असाही सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com