दुचाकीच्या धडकेत गर्भवीत महिलेचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत गर्भवीत महिलेचा मृत्यू

वावडता येथील घटना, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल ः पोटातील आठ महिन्याचे बाळही दगावले

जळगाव : jalgaon

तालुक्यातील वावदडा येथे शौचास जात असलेल्या ज्योती दीपक गोपाळ (वय २१) या गर्भवती महिलेस मद्यपी दुचाकीस्वाराने धडक दिल्याची रविवारी सायंकाळी घडली होती. अपघाता जखमी ज्योतील गोपाळ यांचा उपचार सुरु असताना मध्यरात्री मृत्यू झाला. यात त्यांच्या पोटातील आठ महिन्याचे बाळही दगावले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होवून धडक देणारा दुचाकीस्वार सुपडू उर्फ नाना विक्रम जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.

संशयिताविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा करावा अशी मागणी पती, सासरे व कुटुंबियांनी केली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी नातेवाईकांची समजूत घातली, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे शवविच्छेदन झाल्यानंतही दुपारपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com