
चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावरील (Chalisgaon-Aurangabad Highway) कन्नड घाटातील (Kannada Ghat) मेणबत्ती पॉंईटजवळ पुढे चालणार्या ट्रकला दुचाकीचालकाने ओव्हरटेक (Truck overtakes two-wheeler) करीत असताना, मागे बसलेल्या ३२ वर्षीय महिलेचा (woman) तोल (balance) जावून ती ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू (Death on the spot)झाला आहे. हि घटना दि,४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे घाटातील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वेळीच महामार्ग पोलिसांनी (Highway police) घटनास्थळी धाव घेत, वाहतुक सुरुळीत केली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावरील (Chalisgaon-Aurangabad Highway) कन्नड घाटातून पतीसोबत दुचाकीवर(क्र.एमएच,१५, बीजी ७७६१) मागे बसून सविता देवचंद राठोड (३२) रा.सिताने तांडा, कोलवाडी ता.कन्नड या जात असताना, त्यांच्या पुढे चालणार्या ट्रकला (क्र.एचआर ४७, डी,८७७२) घाटातील मेणबत्ती पॉईंट जवळ ओव्हरटेकच्या नांदात, दुचाकीवर बसलेल्या सविता यांचा तोल (balance) जावून त्या थेट ट्रकच्या मागील चाकाखाली आल्या. ट्रक वेगात असल्यामुळे त्याच्या डोक्यावरुन ट्रकचेे चाक गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू (Death on the spot) झाला. या घटनेमुळे घाटातील वाहतुकीचा पूर्णता; खोळंबा झाला.
घटनेची माहिती मिळतात महमार्ग पोलीसचे (Highway police) पो.उपनिरिक्षक भागवत पाटील, एसआय अशोक चौधरी, प्रताप पाटील, हेकॉ. सुनील पाटील, विरेंद्र शिसोदे, योेगेश बेलदार, अमीर तडवी, धनंजय सोनवणे, श्रीकांत गायकवाड, पोना.दिवाकार जोशी, संजय खंडारे, वसीम शेख कादर शेख आदिनी घटनास्थळी धाव घेतली, आणि मयत व जखमीना रुग्णावाहिका बोलून ताडीने ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.
तर घाटातील खोळंबा झालेली वाहतुक सुरुळीत केली. तसेच ग्रामीण पोलिसांनी देखील घटनेबाबत पंचनामा केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.