शेतात जावून येते असे सांगितले अन्‌ आढळल्या या अवस्थेत...!

शेतात जावून येते असे सांगितले अन्‌ आढळल्या या अवस्थेत...!

यावल - प्रतिनिधी Yaval

तालुक्यातील अट्रावल (Atraval) येथे शेतातील बांधावर असलेल्या शेतातील पाण्याच्या चारीत पडुन एका वयोवृद्ध महीलेच्या (Old lady) दुदैवी मृत्यु (Death) झाला असुन याबाबत (police) पोलीस ठाण्यात आक्समात मृत्यु नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की लिलाबाई रामकृष्ण चौधरी (वय ७५) वर्ष, राहणार अट्रावल तालुका यावल या काल पासुन आपल्या शेतात जावुन येते असे सांगुन दि.10 मे रोजी आपल्या घरून निघाल्या परन्तु त्या उशीरापर्यंत घरी न आल्याने अट्रावल गावातील पोलीस पाटील पवन चौधरी, चंद्रकांत चौधरी, योगेश चौधरी, रविन्द्र चौधरी, अभय महाजन व काही ग्रामस्थांच्या मदतीने लिलाबाई यांचा शोध शोध करण्यात आली असता आज दि.११ मे रोजी सकाळी १० वाजता त्या अट्रावल शिवारातील देशमुखीतील नामदेव धनजी ढाके यांच्या शेताजवळच्या बांधावर असलेल्या पाण्याच्या चारीत त्या मृत अवस्थेत आढळुन आल्यात.

त्या वयोवृद्ध असल्याने पाण्याच्या चारीत कोसळुन त्यांचा मृत्यु झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मयताचे नातु परेश रमेश चौधरी यांनी खबर दिल्याने आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत लिलाबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.बी.बारेला व वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनी केले.

Related Stories

No stories found.